🌟मतदानाची टक्‍केवारी वाढविण्‍यासाठी मंगरुळपीर शहरात मतदान जनजागृती कार्यक्रम मोठया उत्‍साहात संपन्‍न....!


🌟शहरात तहसील कार्यालय व नगर परिषद प्रशासनाकडून विविध उपक्रम घेण्‍यात येत आहेत🌟


फुलचंद भगत

वाशिम:-मंगरुळपीर तहसील कार्यालय व नगर परिषद मंगरुळपीर यांचे वतीने मागील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्‍या तुलनेत यावेळी मतदानाची टक्‍केवारी वाढविण्‍यासाठी मतदानाची जागृती करण्‍यासाठी मंगरुळपीर शहरात विविध उपक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते.त्‍या अनुषंगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची विविध कामाची जबाबदारी शासकीय अधिकारी , कर्मचारी यांचे कडे सोपविण्‍यात आली असून त्‍यामधील स्‍वीप SVEEP,मतदान टक्‍केवारी वाढीसाठी अमंलबजावणी करण्‍याच्‍या उददेशाने मंगरुळपीर शहरात तहसील कार्यालय व नगर परिषद प्रशासनाकडून विविध उपक्रम घेण्‍यात येत आहेत.


              लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्‍या निवडणुकीत तालुक्यातील, शहरातील महिला मतदारांची टक्‍केवारी वाढविण्‍याच्‍या उददेशाने आज दिनांक ०२ एप्रील २०२४ रोजी जि.प.माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय मंगरुळपीर येथे मतदान जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत बाईक रॅलीचे आयोजन करण्‍यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मान्यवरांच्या हस्ते बाईक रॅलीला संबोधित करुन मेन रोडने बिरबलनाथ मंदिर,दर्गाह रोडने सुभाषचंद्र बोस चौक,कल्याणी चौक मार्गे महाराणा प्रताप चौक,विर भगतसिंग चौक मार्गे तहसील कार्यालय परिसरात आगमन झाले.सदर कार्यक्रमाध्‍ये मंगरुळपीर शहरातील महिला मतदार यांना मतदानाचे किती महत्‍व आहे व त्‍या बाबत आपली काय जबाबदारी आहे तसेच महिलांचा मतदान प्रक्रियेमध्‍ये सहभाग वाढविण्‍यासाठी महिलांना अगदी सोप्‍या व साध्‍या भाषेत महत्‍व सांगून बुवनेश्वरी एस.जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी वाशिम यांनी प्रोत्‍साहीत केले. यावेळी सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंह जाधव , शितल बंडगर तहसीलदार मंगरुळपीर, गटविकास अधिकारी रवींद्र सोनोने,नगर परिषद मुख्याधिकारी सतिष शेवदा , गटशिक्षणाधिकारी गजानन शिंदे,नायब तहसीलदार निवडणूक राजेश बोंडे, नायब तहसीलदार महसूल निरंजन सातंगे, नायब तहसीलदार उपविभागीय कार्यालय राजेश ढोंबळे, ठाणेदार सुधाकर आडे, प्रशासन अधिकारी सतिश गायकवाड,शरद इंगोले,राजु संगत, दिनेश राठोड,श्रावणी हिंगासपुरे, घनश्याम तवले, मिलिंद भगत,सर्व तलाठी, शिक्षिका, ग्रामसेवक, कृषी सहायक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका,बचत गट महिला, तहसील कर्मचारी,नगर पालिका कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी,पोलिस प्रशासन, वार्ताहर, प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनिधी,बहूसंख्येने उपस्थित होते.तालुक्यातील व शहरातील महिला मतदार नोंदणी व मागील लोकसभा निवडणूकीच्या टक्‍केवारी मध्‍ये वाढ कशी करता येईल,याकरीता महिलांनी बचत गटामार्फत देशकार्य करून लोकशाही मजबूत करण्‍यासाठी महिला  मतदान टक्‍केवारी वाढीसाठी  आपले योगदान देण्‍याचे आवाहन तालुका दंडाधिकारी अधिकारी तथा तहसलिदार शितल बंडगर यांनी उपस्थित महिलांना केले.आजचा युवक व युवतींना  प्र‍थमच नोंदणी करून प्रथमच मतदान करणा-यांना मतदान प्रक्रीयेबाबत मार्गदर्शन करुन राजेंद्र सिंह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी  यांनी प्रोत्‍साहीत केले. सदर कार्यक्रमा दरम्‍यान मी मतदान करणारच. अशा आशयाचा भारत निवडणूक आयोगाचा एकी म्‍हणजे निवडणूक आयोगाचा दूत म्‍हणून कार्य करणा-या चित्राचा सेल्‍फी पॉईंट तयार करून उपस्थितांने सेल्‍फी घेतली तसेच स्‍वाक्षरी अभियानाअंतर्गत मी मतदान करणारच असे नमूद करून स्‍वाक्षरी मोहीम राबविण्‍यात आली.प्रसंगी आम्ही आहोत महिला मतदार, मतदानाचा हक्क अवश्य बजावणार ह्या टॅगलाईनची घोषणा देण्यात आली. तसेच जि.प.माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्‍या शिक्षक -शिक्षिकांनी मतदान जनजागृती रॅलीमध्ये सहभाग घेतला.सदर कार्यक्रामाला शहरातील बचत गटातील शेकडो महिलांची उपस्थिती होती.

      कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्रशासक तथा मुख्‍याधिकारी सतिश शेवदा यांनी केले,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपक राजारामजी राऊत राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक जि.प.माध्यमिक विद्यालय मंगरूळपीर यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल भगत न.प. कर्मचारी यांनी केले तर कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेकरीता तहसील , नगर परिषदेच्या  अधिकारी कर्मचारी यांनी प्रयत्‍न केले.....

प्रतिनीधी :- फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या