🌟परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातील मुदगल बंधारा पाण्याअभावी पडला कोरडा....!

🌟शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर : बंधाऱ्यात तात्काळ पाणी सोडण्याची मागणी🌟 

परभणी : परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातील मुदगल बंधारा पाण्या अभावी अक्षरशः कोरडा ठक्क पडला असून त्यामुळे सोनपेठ शहरासह जवळपास तीस गावांचा पाणी पुरवठा मुदगल उच्चपातळी बंधाऱ्यावर अवलंबुन असल्यामुळे या गाव परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह शेत शिवारातील पिकांचा प्रश्न देखील गंभीर झाला असल्याने मुदगल बंधाऱ्यात बी ५९ या चारी व्दारे फुलारवाडी येथून ओढ्याव्दारे मुख्य कालव्यातील पाणी सोडण्याची मागणी खा.संजय उर्फ बंडू जाधव यांनी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे. 


परभणी जिल्हाधिकारी गावडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पाथरी तालुक्यातील मुदगल बंधा-या लगतच्या गोदावरी नदी काठा वरील अनेक गावां सह सोनपेठ शहराला पिण्याचा पाणी पुरवठा मुदगल बंधाऱ्यातुन होतो. गोदावरी नदी पात्रात अनेक गावच्या पिण्याच्या पाण्याच्या विहीरी आहेत. सद्यस्थितीत मुदगल बंधारा पुर्णत: कोरडा पडल्याने पाणी उपलब्ध नसल्यामुळे नदी काठावर असलेल्या गावांन तिव्र पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे सोनपेठ शहरा सह गोदावरी नदी काठावरील २० ते २५ गावात पाण्या अभावी पिण्याचा पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. तसेच बी ५९ या चारीवर येणा-या गावातील नदी,नाले,ओढे यांना  पाणी सोडून वन्य प्राण्यां सह पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.

करिता गोदावरी नदी काठा सह पाथरी आणि बाभळगाव मंडळातील गावांना पाणी मिळावे व पाणी टंचाई दुर व्हावी या उद्देशातुन जायकवाडीच्या मुख्य कालवा येथून बी ५९ चारी व्दारे फुलारवाडी येथून गोदावरी नदीपात्रातील ढालेगांव बंधाऱ्यात तात्काळ पाणी सोडण्यात यावे अशी निवेदन वजा विनंती परभणीचे खा संजय उर्फ बंडू जाधव यांनी परभणी जिल्हाधिकारी यांना केली आहे या शिवाय या भागाील अनेक ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचे ठराव घेऊन त्याच बरोबर ग्रामस्थांनी निवेदने देऊन बी ५९ या चारीला पाणी सोडून नदी,नाले,ओढे यांना पाणी सोडावे अशी मागणी केलेली आहे. या पुर्वीही खरीपात खा बंडू जाधव यांच्या पाठपुराव्या मुळे सप्टेबर २०२३ मध्ये जायकवाडीचे पाणी बी ५९ या चारीला  सोडल्याने काही अंशी खरीपाची पिके वाचली होती तर पिण्या सह शेती पाण्याचा प्रश्न मार्गी लागला होता.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या