🌟हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांची उल्लेखनीय कामगिरी.….!


🌟विविध गुन्ह्यांतील आरोपीकडून हस्तगत केलेला ३६,०७,४५०/- रुपयाचा मुद्देमाल फिर्यादींना केला परत 🌟

हिंगोली (दि.३० एप्रिल) - हिंगोली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष कर्तव्यतत्पर जिल्हा पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या संकल्पनेतुन हिंगोली जिल्ह्यातील विविध पोलिस स्थानकांतर्गत घडलेल्या गुन्ह्यांतील आरोपीकडून हस्तगत केलेला मुद्देमाल त्या घटनांतील फिर्यादीस परत करण्याबाबत मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत एकुण ३६,०७,४५०/- रुपयाचा मुद्देमाल फिर्यादींना सन्मानपूर्वक परत करण्यात आला.

हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक केले जात आहे त्यांनी राबवलेल्या या विशेष मोहीमेचे जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्थानकांनी स्वागत केले असून या मोहीमेची अंमलबजावणी देखील केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या