🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟लोकसभा निवडणुकीत माझा फोटो, नाव कुणीही वापरू नयेत ; मनोज जरांगे यांची मोठी घोषणा🌟

दिनांक : ०३ एप्रिल २०२४

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे हातकणंगले व हिंगोली मतदारसंघात संघातील उमेदवारी बदलणार हातकणंगले मधुन धैर्यशील माने ऐवजी त्यांच्या आई माजी खासदार निवेदिता माने यांना तिकीट मिळणार तसेच अनेक विद्यमान खासदारांचं तिकीट कट करणार असल्याची चर्चा

* वाशीम यवतमाळ मतदारसंघातुन भावना गवळींचा पत्ता कापून खासदार हेमंत पाटलांच्या पत्नीला उमेदवारीच्या देण्याच्या हालचाली, हिंगोलीतुन हेमंत पाटील यांचंही तिकीट कापून उमेदवार बदलणार ?

* बुलढाणा मतदारसंघात शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा रेकॉर्ड ब्रेक गर्दीत उमेदवारी अर्ज दाखल

* खासदार प्रतापराव जाधव यांचा देखील महायुतीच्या  अनेक नेत्यांच्या व जिल्हयातील महायुतीच्या सर्व आमदारांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल 

* प्रतापराव जाधव यांना तिकीट मिळावे हा माझा उद्देश सफल झाल्यामुळे मी माझा उमेदवारी अर्ज वापस घेणार असल्याचे आमदार संजय गायकवाड यांचे वक्तव्य

* भाजपचे तिकीट कापलेले जळगावचे खासदार उन्मेष पाटील 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंची भेट, उद्या ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता, पुन्हा लोकसभा लढवण्याची चिन्हं  

* सांगलीत लोकसभेचा तिढा वाढला, आमदार विश्वजीत कदम यांचा कॉग्रेसच्या बैठकीवर बहिष्कार , कॉग्रेसचे नेते विशाल पाटील अजुन किती दिवस आजोबांच्या नावावर लढणार,त्यांचे स्वतःचे काही कर्तव्य नाही खासदार संजयकाका पाटील यांची टीका 

* वंचितनंतर एमआयएमही सोलापुरात हुकमी एक्का काढणार ? जामीनावर बाहेर असलेले माजी आमदार लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता 

* लोकसभा निवडणुकीत माझा फोटो, नाव कुणीही वापरू नयेत ; मनोज जरांगेंची मोठी घोषणा 

* उमेदवाराने अर्जासोबत दिली चक्क साडेबारा हजारांची चिल्लर 

* ससून रुग्णालयाच्या ICU मध्ये उंदीर चावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक प्रकार 

* हार्दिकचं कर्णधारपद जाणार, रोहित पुन्हा मुंबईची धुरा संभाळणार, मनोज तिवारीनं केला मोठा दावा   रोहितचं कर्णधारपद का काढलं, हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीबाबात मोठा ट्विस्ट, नवजोत सिंह सिद्धू यांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण 

* काँग्रेसने आज आंध्रप्रदेश, बिहार, ओडिशा व पश्चिम बंगालमधील 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर; कडप्पा मतदारसंघातून आंध्रप्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्ष वाय. एस. शर्मिला रेड्डी यांना उमेदवारी घोषित

* लोकसभा निवडणुकीत मुंबईतील ठाकरे गटाचे पाचही उमेदवार पडतील; संजय निरुपमांचं छातीठोक भाकीत

* बारामतीमध्ये अजित पवार यांना जसं मतदान पडतं तसं मतदान इतर तालुक्यांमध्येही पडलं तर तुमचाही विकास बारामतीसारखाच होईल, सुनेत्रा पवार यांचं दौंड तालुक्यातील नानगाव येथील ग्रामस्थांना आश्वासन 

* दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी 'आप'चे खासदार संजय सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा दिलासा; संजय सिंह यांचा न्यायालयाने जामीन मंजूर केला

* गायीका कार्तिकी गायकवाडचे वडील कल्याणजी गायकवाड यांना श्री संत एकनाथ महाराज स्वर मार्तंड पुरस्कार प्रदान

* शरद पवार गटाची दुसरी यादी उद्याच जाहीर होणार; रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा या लोकसभा मतदारसंघाचा समावेश असणार  

* पाच तास गायब असलेले मुख्यमंत्री अमावस्या आणि पौर्णिमेला शेती करायला जातात, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

* रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपकडेच, कोणीही मध्ये लुडबूड करु नये- नारायण राणेंचा थेट इशारा

* महाराष्ट्रात यंदाचा उन्हाळा कडक, 20 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

 ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या