🌟परभणीत महायतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची दि.२० एप्रिल रोजी सभा..... !


🌟प्रधानमंत्री मोदींच्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार🌟


परभणी (दि.१८ एप्रिल) :  परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवार दि.२० एप्रिल रोजी दुपारी १२-०० वाजता पाथरी रस्त्यावरील श्री लक्ष्मी नगरीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून या सभेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील उपस्थिती असणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ.भागवत कराड व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

  यावेळी आमदार डॉ. रत्लाकर गुट्टे, आमदार मेघना बोर्डीकर, राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, महानगर अध्यक्ष राजेश देशमुख, माजी महानगराध्यक्ष आनंद भरोसे, शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख आदी उपस्थित होते पंतप्रधान श्री.मोदी यांचे शनिवारी (दि.20) सकाळी नांदेड येथील विमानतळावर आगमन होणार आहेत. नांदेड येथील प्रचारसभा सकाळी 10 वाजता आटोपून ते हेलिकॉप्टरने परभणीकडे प्रयाण करणार आहेत. धर्मापुरी शिवारात अ‍ॅड. दीपकराव देशमुख यांच्या शेतात तयार केलेल्या हेलिपॅडवर श्री. मोदी यांचे सकाळी 11.45 वाजता आगमन होणार असून 12 वाजून 5 मिनिटांनी पंतप्रधान मोदी हे सभास्थानी असणार आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,   महायुतीचे उमेदवार महादेव जानकर,न आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत.

           श्री. मोदी आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासाठी स्वतंत्र हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली असून भव्य सभामंडप, हेलिपॅडस तयार करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. पाथरी रस्त्यावरील तीन ठिकाणी वाहनतळांची सोय करण्यात आली असून प्रत्येक मतदारसंघातील गावा गावांमधून कार्यकर्त्यांबरोबरच मतदारसुध्दा सभास्थानी यावेत या दृष्टीने अन्य व्यवस्थाही करण्यात आल्या आहेत, असे या नेतेमंडळींशनी नमूद केले दरम्यान, महायुतीच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या प्रचारसभा परभणी लोकसभा मतदारसंघात विधानसभानिहाय होणार असल्याची माहिती डॉ. कराड यांनी यावेळी दिली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या