🌟लोकसभेचा प्रचार सोडून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या धर्मपत्नी ॲड.शर्वरी तुपकर धावल्या थेट बांधावर🌟
🌟ॲड.शर्वरी तुपकर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर🌟
बुलढाणा :- मोताळा तालुक्यात आज अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वारे आणि अवकाळी पावसाने तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचंड नुकसान झाले. ही माहिती मिळताच शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या धर्मपत्नी ॲड.शर्वरी रविकांत तुपकर यांनी मोताळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात भेट देऊन नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला.
सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसानेही थैमान घातले आहे. दरम्यान आज अचानक झालेल्या अवकाळी पावसाने मोताळा तालुक्यात प्रचंड नुकसान झाले. शेतकरी नेते रविकांत तुपकर लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांच्या लोकसभेच्या प्रचारात व्यस्त असतांना देखील रविकांत तुपकर यांच्या वतीने ॲड.शर्वरी रविकांत तुपकर यांनी तातडीने मोताळा तालुक्यात नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे. मक्याची उभी पिके कोलमडून पडली आहेत. शेतकऱ्यांचे प्रचंड असे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने निवडणूकीचा काळ असला तरी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करायला प्राधान्य द्यावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी नुकसानग्रस्त भागात सर्वे करून शासनस्तरावर प्रस्ताव पाठवावा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केली आहे......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या