🌟स्टुडंटस इस्लामिक ऑफ इंडिया (सिमी) संघटनेवर आणखी पाच वर्षासाठी बंदी....!



🌟केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला निर्णय : कार्यवाहीचा अहवाल शपथपत्राच्या प्रतीसह शासनाकडे सादर करण्याचे आवाहन🌟 

परभणी (दि.04 एप्रिल) : ‘स्टुंडट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) या संघटनेवर आणखी पाच वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे. 

उपसचिव, गृह विभाग मंत्रालय, मुबंई यांनी सहायक निर्देशक,भारत सरकार, नवी दिल्ली यांचे व न्यायाधिकरणाच्या दि.29 फेब्रुवारी, 2024 च्या आदेशानुसार बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम 1967 अन्वये स्टुडंटस इस्लामिक मुव्हमेंटऑफ इंडिया (सिमी) या संघटनेला कलम 42 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करतांना केंद्र सरकारने अधिसूचना दि.5 फेब्रुवारी, 2024 अन्वये सर्व राज्यांना केंद्र शासित प्रदेशांनी कलम 7 व 8 अंतर्गत निर्देश दिलेले आहे. या प्रकरणात न्यायाधिकरणाची नोटीस बजावून तसेच शपथपत्र दाखल करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शपथपत्राच्या प्रतीसह शासनाकडे सादर करण्याबाबत कळविल आहे. 

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या