🌟पुर्णेतील पारधी समाजाच्या पालावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी...!


🌟यावेळी ३५ पारधी समाजाच्या लोकांना त्यांच्या हक्काचे मतदार कार्ड,रेशन कार्ड व आधार कार्ड काढून देण्यात आले🌟

परभणी/पुर्णा - परभणी जिल्ह्यातील पुर्णा शहरातील पारधी समाजाच्या वस्तीवर म्हणजेच पालावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अनोख्या पद्धतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आल भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज जगभर साजरी होत आहे. डी जे, बॅनर, ढोल ताशे या प्रचलित पद्धतीने महामानवाची जयंती साजरी न करता आजुन ही समाजाच्या मुख्य प्रवाहा पासून कोसो दूर असलेल्या आणि आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या पारधी समाजाच्या वस्तीवर म्हणजेच पालावर जाऊन प्रहार जनशक्ती पक्षाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून वंचित आणि दुर्लक्षित घटकासाठी काम करण्याच्या प्रहारच्या भूमिकेला साजेसे कार्य केले. या पूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पूर्णा तालुक्यातील ३५ पारधी समाजाच्या लोकांना त्यांच्या हक्काचे मतदार कार्ड, रेशन कार्ड व आधार कार्ड काढून देण्यात आले.

यावेळी उपस्थित सर्वांच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्या नंतर पालावरील सर्वांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अल्पोहापर देऊन त्यांचे तोंड गोड करण्यात आले.यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, शहर प्रमुख संजय वाघमारे, सय्यद मुनीर, सलीम शाहा,  सीता, धर्मराज टोपक्या, रेणुका, श्रीदेवी, यंकप्पा, भागम्मा, गंगाबाई, अजिंक्या, ज्योती, शशिकला, शंकर, कमलबाई, साहेबराव, लक्ष्मी, राजू, सुशीला, श्याम इत्यादी पारधी कुटुंबातील भोसले व पवार आपल्या मुलाबाळासह उपस्थित होते तसेच परिसरातील सर्व जाती धर्मातील अबाल वृद्ध मोठ्या संख्येने भीम जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या