🌟वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डख यांच्या निवडणूक प्रचारार्थ अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांची उद्या दि.१९ रोजी जाहीर सभा....!


🌟परभणी शहरातील जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर सकाळी दहा वाजता जाहीर सभा🌟


परभणी (दि.18 एप्रिल) : परभणी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाबराव डख यांच्या निवडणूक प्रचारार्थ उद्या शुक्रवार दि.19 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय प्रवक्ते डॉ. धर्मराज चव्हाण यांनी दिली आहे.

            या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेला विभागीय प्रशिक्षक प्रा. डॉ. सुरेश शेळके, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुनिता साळवे, युवक जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, सम्यक जिल्हाध्यक्ष सोमेश भुजबळ यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना डॉ. चव्हाण म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्याचे भुमिपुत्र असलेले मराठा समाजातील हवामान अभ्यासक पंजाब डख यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा प्रचार करण्यासाठीच अ‍ॅड. आंबेडकर यांची परभणीत जाहीर सभा 19 एप्रिल रोजी आयोजित केली आहे. त्याचप्रमाणे परभणी लोकसभा मतदारसंघातील परतूर व घनसावंगी येथे त्यांची प्रचारसभा घेण्याबाबत चर्चा व नियोजन सुरू आहे, असेही ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या