🌟कित्येक वर्षे सत्ता उपभोगूनही काँग्रेसने मराठवाडा मागास ठेवला : नांदेड येथील विराट जाहीर सभेत पंतप्रधान मोदींची टिका🌟
नांदेड (दि. 20 एप्रिल) - कित्येक वर्षे सत्ता उपभोगूनही काँग्रेसने मराठवाडा मागास ठेवला,या विभागाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले,मराठवाडा हा देशाचे सुरक्षा कवच आहे. येथे निजाम, मुगल, इंग्रज आले, पंरतु येथील जनतेने मोठ्या धाडसाने अशा शक्तींचा सामना केला.काँग्रेस जनतेचे समाधान करू शकत नाही, पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहणारे शहजादे राहूल गांधी यांनी पारंपारिक मतदारसंघ अमेठीतून पळ काढला, आता वायनाडही सोडण्याची आणि दुसरा सुरक्षित मतदारसंघ शोधण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. कधी नव्हे इतकी बिकट अवस्था काँग्रेसची झाली आहे.
इंडिया आघाडीतील पक्ष देशातील 25 टक्के मतदारसंघात एकमेकांविरुद्ध लढत आहेत, परस्परांविरुद्ध आरोप करीत आहेत.अशी बिकट अवस्था इंडिया आघाडीची झाली आहे. एवढेच नव्हे, तर निवडणुका घोषीत होण्याआधीच काँग्रेसवर पराभव स्वीकारण्याची नामुष्की आली, या निवडणुकीत एनडीएचा मोठा विजय निश्चित असून पहिल्या टप्प्यात एनडीएच्या बाजुने झालल्याने एकतर्फी मतदानामुळे पुन्हा एनडीएचे सरकार देशात सत्तारुढ होणार हे आता स्पष्ट झाले आहे, काँग्रेसने आजवर दिलेल्या जखमांवर उपचार करणे ही मोदींची गॅरंटी आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेड येथील मोदी ग्राऊंडवर झालेल्या विराट जाहीर सभेत व्यक्त केले.
नांदेड लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार खा. प्रतापराव पाटील चिखलीकर आणि हिंगोली लोकसभेचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचारार्थ मोदी ग्राऊंड असर्जन रोड कौठा येथे शनिवारी सकाळी दहा वाजता झालेल्या प्रचंड जाहीरसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित हजारो जनसमुदायाला संबोधीत करताना काँग्रेस, इंडिया आघाडीचा चांगलाच समाचार घेतला. देशाची सुत्रे कोणाच्या हाती द्यायची याचा विचार देशभरातील सुज्ञ जनतेला करण्याची वेळ आली आहे.काँग्रेसला जनादार राहिलेला नाही. पारंपारिक मतदारसंघातून अनेकदा लोकसभेवर गेलेले या पक्षाचे नेते आता मागच्या दाराने राज्यसभेत शिरकाव करीत आहेत,जनतेपुढे जाऊन निवडणूक लढण्याची या नेत्यांमध्ये आता हिंमत राहिलेली नाही,अनेक ठिकाणी उमेदवार मिळाले नाहीत, इंडिया आघाडीत सुरु असलेली बिघाडी पाहता निवडणुकीनंतर या आघाडीतील नेते एकमेकांचे कपडे फाडून घेतील, अशा लोकांसाठी आपली मते वाया घालू नका, अशा नेत्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे मोदी म्हणाले.
देशातील शेतकरी, शेतमजुर, महिला, युवा वर्ग यांच्यासाठी एनडीए सरकार एक मजबूत व सुरक्षित भिंत म्हणून उभी आहे.कोट्यवधी महिलांसाठी सरकारने शौचालये उभारली, 50 कोटी गरीबांसाठी बँक खाते उघडून दिले,डिजीटल इंडिया तंत्रज्ञान आणून त्या माध्यमातून व्यवहार सुरु झाले, परंतु आमच्या सर्व विकास योजनांची काँग्रेस खिल्ली उडवित आहे, देशातील जनतेचा अपमान करीत आहे. हा अपमान देशातील जनता सहन करणार नाही, मराठवाडा, विदर्भ मागास राहण्याला काँग्रेस जबाबदार असून पायाभूत सुविधा नसल्याने शेतकरी, गरीब, युवकांना काँग्रेसने वार्यावर सोडले, या भागाच्या विकासासाठी एनडीए सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले.
* स्व.शंकररावजींची आठवण :-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांना भेटण्याचा योग आल्याचा प्रसंग सांगितला. आपण राजकारणात नसताना श्री सत्यसाई बाबांच्या दरबारी स्व.शंकरराव चव्हाण यांचा परिचय झाला. मी त्यावेळी सामान्य व्यक्ती होतो, त्यांना भेटण्याचे सौभाग्य मला मिळाले, असे सांगून आज संपूर्ण चव्हाण परिवार आमच्यासोबत असल्याचे नमूद केले.
* नांदेडमध्ये अनेक योजना :-
नांदेडच्या विकासाबाबात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, नांदेडमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी, सिंचन व्यवस्था, शेतकर्यांना पीक विम्याची पाच टक्के अधिक रक्कम, तसेच किसान सन्मान योजने अंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्यांना 1300 कोटी रुपये मिळाल्याची माहिती सांगून समृद्ध महामार्ग, विमानसेवा उपलब्ध झाली असून पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पक्की घरेही मिळाली आहेत. याशिवाय आयुष्यमान भारत योजने अंतर्गत 3 लाख लोकांना मोफत औषधोपचाराची सुविधाही दिल्याचे त्यांनी सांगितले.येथील पवित्र गुरुद्वारा व शीख बांधवांचा उल्लेख करताना मोदी यांनी समस्त शीख बांधव आमच्यासोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला. मराठवाडा आणि महाराष्ट्राला पुढे न्यायचे आहे, आजपर्यंत काँग्रेसने दिलेल्या जखमांवर उपचार करणे ही मोदींची गॅरंटी आहे, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी नांदेडचे उमेदवार खा.प्रतापराव पाटील चिखलीकर व हिंगोलीचे उमेदवार बाबुराव कदम यांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण, उमेदवार खा.प्रतापराव पाटील चिखलीकर,खा.डॉ.अजित गोपछडे, संघटनमत्री संजय कौडगे, महायुतीचे हिंगोलीचे उमेदवार बाबुराव कदम, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर, आ. राम पाटील रातोळीकर, आ. भिमराव केराम, आ. तुषार राठोड, आ. राजेश पवार, आ. बालाजीराव कल्याणकर, आ.संतोष बांगर, आ.तानाजी मुटकूळे, आ. राजू नवघरे, आ.नामदेव ससाणे, लोकसभा समन्वयक व्यंकटराव पाटील गोजेगावकर, प्रदेश सचिव देविदास राठोड, जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, जिल्हाध्यक्ष हिंगोली फुलाजी शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष आरपीआय विजय सोनवणे, महिला मोर्चा अध्यक्षा सौ.पुनमताई पवार, प्रदेश उपाध्यक्षा महिला मोर्चा सौ.प्रणिताताई देवरे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, शिवसेना जिल्हाध्यक्ष आनंदराव बोंढारकर, भाजप नेते श्रावण पाटील भिलवंडे, बालाजी बच्चेवार आदींची उपस्थिती होती.....
0 टिप्पण्या