🌟शिवसेना नेते पदी निवड झाल्याबद्दल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा संभाजीनगरमध्ये आज भव्य सत्कार.....!


🌟संभाजीनगर शिवसेनेच्या वतीने चिकलठाणा विमानतळ ते क्रांती चौक काढण्यात येणार भव्य रॅली🌟

✍️ मोहन चौकेकर 

संभाजीनगर : विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची ता. 14 एप्रिल रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते पदी निवड झाल्याबद्दल संभाजीनगर येथे भव्य सत्कार सोमवार ता. 15 एप्रिल रोजी करण्यात येणार असुन सकाळी 06 वाजता  शिवसेना संभाजीनगरच्या वतीने चिकलठाण विमानतळ ते क्रांती चौक पर्यंत महारॅली काढण्यात येणार आहे.

याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी, युवासेना,महिला आघाडी, अंगीकृत संघटना, आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक,नगरसेवक व लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख किशनचंद तनवानी, राजेंद्र राठोड, महानगरप्रमुख राजू वैद्य, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात,विजय वाघचौरे,विश्वनाथ स्वामी,ज्ञानेश्वर डांगे, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, युवासेना सचिव ऋषिकेश खैरे, सहसचिव धर्मराज दानवे व जिल्हा युवाधिकारी हनुमान शिंदे यांनी केले आहे..... 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या