🌟 नांदेड दमरे विभागांतर्गत चालणाऱ्या सचखंड,हमसफर आणि पनवेल या प्रवासी एक्सप्रेस एक दिवस उशीराने धावणार....!


🌟अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली🌟

नांदेड (दि.२५ एप्रिल) : दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत चालणाऱ्या सचखंड एक्सप्रेस,हमसफर एक्सप्रेस आणि पनवेल विशेष एक्सप्रेस रेल्वे एक दिवस उशिरा सुटेल अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली आहे.

              नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक १२७१५ हुजूर साहिब नांदेड-अमृतसर सचखंड एक्सप्रेसची नियमित वेळ सकाळी ०९-३० वाजता असून ही गाडी शुक्रवार दि.२६ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ०३-०० वाजता सुटणार आहे तर नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक १२७५१ हुजूर साहिब नांदेड-जम्मू तावी हमसफर एक्सप्रेस तिची नियमित वेळ सकाळी ११-०५ वाजता असून त्या ऐवजी ही एक्सप्रेस सायंकाळी ०६-०० वाजता सुटणार आहे.

             तसेच पनवेल येथून सुटणारी गाडी क्रमांक ०७६२६ पनवेल ते  हुजूर साहिब नांदेड विशेष एक्सप्रेस तिची नियमित वेळ दुपारी ०२-३० वाजता असून त्याऐवजी ही एक्सप्रेस २५ एप्रिल रोजी रात्री १०-०० वाजता सुटेल अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या