🌟वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे महामानव विश्वरत्न बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव उत्साहात साजरा...!


🌟प्रणित मोरे पाटील यांनी केले विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन🌟

फुलचंद भगत

वाशिम:-वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

            सर्वप्रथम  महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त कारंजा शहरांमधून भव्य रथयात्रा काढण्यात आली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रथ  उत्सव मिरवणुकी दरम्यान प्रणित मोरे पाटील यांच्याकडून थंड पाण्याचे  व सरबतचे भीम प्रेमी यांच्यासाठी आयोजन करण्यात आले होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये प्रणित मोरे यांनी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे पूजन व हार अर्पण करून संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या