🌟भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशातील युगपप्रवर्तक महापुरुष - भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो


🌟 महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त आयोजित जयंती महोत्सव सोहळ्यात ते म्हणाले🌟 


पुर्णा (दि.१५ एप्रिल) :- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महामानव तथागत भगवान बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीने काल रविवार दि.१४ एप्रिल २०२४ रोजी पुर्णा शहरामध्ये महामानव विश्वरत्न बोधीसत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या भव्य आणि दिव्य जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. 


सकाळच्या सत्रा मध्ये सकाळी ०९-०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ.उपगुप्त महा थेरो सार्वजनिक जयंती मंडळाचे अध्यक्ष भदंत बोधिधम्मा भदंत पयावंश भदंत संघरत्न व  तालुक्याचे तहसीलदार माधवराव बोथीकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील पोलीस निरीक्षक घोबाडे ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम  माजी उपनगराध्यक्ष उत्तम भैया खंदारे माजी नगरसेवक संतोष एकलारे नगरसेवक अनिल खर्ग खराटे मधुकर गायकवाड यादवराव भवरे सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित कॉम्रेड अशोक व्ही कांबळे एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड एडवोकेट धम्मदीप जोंधळे महेबुब कुरेशी अशोक धबाले रेल्वे विभागाचे सीनियर सेक्शन ऑफिसर कीर्तिकर प्राचार्य राम धबाले मास्टर अनिल कांबळे ज्येष्ठ पत्रकार विजय बगाटे प्राचार्य डॉ.केशव जोंधळे अमृत मोरे टी झेड कांबळे वारा काळे शिवाजी थोरात मुगाजी खंदारे ज्ञानोबा जोंधळे प्राध्यापक अशोक कांबळे  व सार्वजनिक जयंती मंडळ सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर महिला मंडळ समता सैनिक दल यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करून पूर्णा तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या हस्ते पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी समता सैनिक दलाच्या वतीने समता सैनिक दलाचे विभागीय मेजर नरेंद्र सोनुले विश्वनाथ कांबळे व समता सैनिक दल यांच्या वतीने मानवंदना देण्यात आली.भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड यांनी यामध्ये परिश्रम घेतले उपस्थिताना त्रिशरण पंचशील भिकू संघाने दिले. 

आपल्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महती विशद करताना सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांचे मागासवर्गीयाचे नेते नव्हते ते संपूर्ण भारत देशाचे युग प्रवर्तक महापुरुष होते भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी या देशामध्ये सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक समता आणण्याचं काम केलं स्त्रियांना समानतेचा अधिकार दिला राज्यकर्त्यांनी त्यांचे विचार कार्य डोळ्यासमोर ठेवून देशाचा विकास केला पाहिजे. जयंतीच्या निमित्ताने त्यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या रेल्वे कार्यालयाच्या समोरील बोधिवृक्षाखाली असलेल्या धम्म ध्वजाचे ध्वजारोहण रेल्वे अधीक्षक भिसे यांच्या हस्ते करण्यात आले त्याचप्रमाणे भदंत उपाली थेरोनगर येथील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण विहार समितीचे सचिव एडवोकेट महेंद्र गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले बुद्ध विहार पूर्णा येथील धम्म ध्वजारोहण अखिल भारतीय भिखु संघाचे कार्याध्यक्ष डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले शांतीनगर येथील धम्म ध्वजारोहण भारतीय बौद्ध महासभेचे परभणी जिल्हा दक्षिणचे माजी जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड यांच्या हस्ते करण्यात आले. 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल येथील धम्म ध्वजारोहन ज्येष्ठ धम्म उपासक सेवानिवृत्त रेल्वे ड्रायव्हर आर. डी कुलदीपके यांच्या हस्ते करण्यात आले. दुपारी एक वाजता डॉक्टर आंबेडकर नगर मधून सज् विलेल्या वाहनांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय संविधान हातात असलेला पूर्णाकृती पुतळा मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करून मिरवणुकीला सुरुवात झाली प्राध्यापक बंडू गायकवाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली असलेले  पंचशील नाट्य ग्रुप लेझीम पथक डॉक्टर आंबेडकर नगर येथील रमाई लेझीम पथक क्रांतीनगर येथील लेझीम पथक मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते अतिशय हर्ष उल्लासामध्ये अमाप जनसागर मिरवणुकीमध्ये सहभागी झाला होता डिजेच्या त्याला सुरामध्ये तरुणाई देहभान विसरून थिरकत नाचत होती.ठिकठिकाणी शीतपेय पाणी वाटप सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थेने केले होते रेल्वे कम्युनिटी हॉलच्या समोरून मिरवणूक जात असताना वाद्याच्या व डीजे च्या आवाजामुळे झाडावरील असलेले आगे मोहोळ उठले  आगे मोहोळाच्या माशा डोक्यावरून घोघावू लागल्या सर्वांनाच भीती वाटू लागली आता ह्या माशा चावतील डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी मिरवणुकीमध्ये असणाऱ्या जनसमुदायाला संबोधित केले आपण या ठिकाणी पळून जाऊ नका घाबरू नका अगदी शांतपणे चला.

यामुळे प्रचंड जनसमुदाय शांतपणे चालू लागला एकही मधमाशी कोणालाही चावली नाही सर्वांनीच याबाबत आश्चर्य व्यक्त केले. मिरवणूक मार्गक्रमण करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार समर्पित करण्यात आला. त्याचप्रमाणे महात्मा बसवेश्वर चौकामध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार समर्पित करण्यात आला यावेळी ज्येष्ठ समाजसेवक संतोष एकलारे नगरसेवक शाम कदम व मान्यवरांची उपस्थिती होती. अगदी सकाळपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सुप्रसिद्ध प्रबोधनकार शाहीर विजय सातोरे यांच्या भीम बुद्ध गीतांचा सुमधुर गायनाचा कार्यक्रम पार पडला.मिरवणुकीचा समारोप सात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी झाला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या हस्ते यावेळी पुष्पहार अर्पण  करण्यात आला.भिकू संघाने उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले जयंती मंडळाचे मार्गदर्शक ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे यांनी आभार मानले. मिरवणूक शांततेत व सुव्यवस्थेत पार पडण्यासाठी जयंती मंडळाचे पदाधिकारी दिलीप गायकवाड साहेबराव सोनवणे अतुल गवळी किशोर ढाकरगे बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे गौतम वाघमारे  बंटी रणवीर इंजिनीयर विजय खंडागळे राम भालेराव राहुल धबाले  प्रवीण कनकुटे चंद्रमणी लोखंडे  आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या