🌟लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २१४ पथकांचे प्रशिक्षण संपन्न.....!


🌟प्रशिक्षणावेळी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना शंकांना प्रशिक्षकांकडून उत्तरे देऊन त्यांचे पूर्ण समाधान करण्यात आले🌟


फुलचंद भगत

वाशिम :-दि. १५ एप्रिल रोजी १४ यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघांतर्गत नेमणूक झालेल्या मतदान अधिकारी यांचे द्वितीयप्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षणामध्ये सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात २१४ पथकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. प्रत्येक पथकात एक मतदान केंद्राध्यक्ष व तीन मतदान अधिकारी  उपस्थित होते. या प्रशिक्षणास जिल्हाधिकारी  बुवनेश्वरी एस यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच १४ यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यवतमाळ जिल्हाधिकारी  पंकज आशिया यांनी नियुक्त केलेले समन्वय अधिकारी श्री.पवार,तहसीलदार वाशिम निलेश पळसकर व तहसीलदार मंगरूळपीर शीतल बंडगर ह्या उपस्थित होत्या.

या प्रशिक्षणास सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा एसडीओ मंगरूळपीर राजेंद्र जाधव, तहसीलदार निलेश पळसकर यांनीही मार्गदर्शन केले या प्रशिक्षणाचे आयोजन हे दोन ठिकाणी करण्यात आले होते मुख्य प्रशिक्षण हे काळे लॉन आरे कॉलेज रोड वाशिम येथे व त्याच पथकांचे मतदान हाताळणी यंत्राचे प्रशिक्षण नवोदय विद्यालय वाशिम येथे घेण्यात आले. प्रशिक्षणानंतर संबंधित पथकातील सदस्यांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली.  प्रशिक्षणावेळी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना शंकांना प्रशिक्षकांकडून उत्तरे देऊन त्यांचे पूर्ण समाधान करण्यात आले. तसेच प्रशिक्षण संपल्यानंतर संबंधितांकडून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण घेतल्याचे व प्रशिक्षणाबाबत कोणतीही अडचण नसल्याबाबत प्रमाणपत्र घेण्यात आले प्रशिक्षणावेळी नेमणूक झालेले सर्व क्षेत्रीय अधिकारी तसेच मंगरूळपीर व वाशिम या दोन्ही तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, तलाठी ,मंडळ अधिकारी हे उपस्थित होते...



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या