🌟वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सौ.राजश्री ताई पाटील यांनी अपघातग्रस्तांना दिला मदतीचा हात...!


🌟अपघातग्रस्तांना त्यांनी त्यांच्या स्वतःच्या गाडीत घेऊन सरकारी दवाखान्यात नेऊन त्यांना मदतीचा हात दिला🌟


वाशिम : वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सौ.राजश्रीताई हेमंत पाटील ह्या काल दारव्हा येथून प्रचार सभा आटोपून परत यवतमाळ कडे येत असतांना त्यांना रस्त्यावर मोठा अपघात झाल्याचे निदर्शनास आले अपघातग्रस्तांची परिस्पाथिती पाहून सौ.राजश्री ताई पाटील यांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबवून अपघातात गंभीर जखमी झालेल्या त्या अनोळखी  युवकांना जवळ जाऊन पाहीले व त्यांना तात्काळ उपचारासाठी मदतीची आवश्यकता असल्याने त्यांनी त्यांच्या स्वतःच्या गाडीत घेऊन सरकारी दवाखान्यात नेऊन त्यांना मदतीचा हात दिला.

या भयंकर अपघातात गंभीर जखमी झालेला अक्षय नावाचा युवक हा एक फार्मासिस्ट आहे सौ.राजश्रीताई पाटील यांनी 'रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा' मानून दिवस भर प्रचार सभा करून थकलेल्या अवस्तेत असतांना सुद्धा सगळं विसरून रुग्णांना मदत करीत असल्याचे दृश्य पाहून उपस्थितीतांनी त्यांच्यातील माणुसकीच्या भावनेचे कौतुक केले.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या