🌟नांदेड-पनवेल रेल्वेत आरक्षित बर्थ उपलब्ध प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन....!


🌟असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने केला आहे🌟

नांदेड (दि.27 एप्रिल) :  नांदेड पनवेल एक्स्प्रेसमध्ये  29 एप्रिल आणि 1 मे ला धावणार्‍या विशेष गाडीमध्ये प्रवाशांकरिता आरक्षित बर्थ उपलब्ध असून प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने केला आहे.

            उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडीच्या 40 फेर्‍या मंजूर केल्या आहेत. या गाड्या द्वी-साप्ताहिक आहेत. त्यामध्ये गाडी क्रमांक 07625 हुजूर साहिब नांदेड ते पनवेल विशेष गाडी 22 एप्रिल ते 26 जून दरम्यान दर सोमवारी आणि बुधवारी नांदेड रेल्वे स्थानकावरून रात्री 11 वाजता सुटेल  आणि परभणी, मानवत, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासुर, रोटेगाव, नगरसोल, अंकाई, इगतपुरी, कल्याण मार्गे पनवेल येथे दुसर्‍या दिवशी दुपारी 12.40 वाजता पोहोचेल. ही गाडी एप्रिल, मे आणि जून महिन्यात मिळून 20 फेर्‍या पूर्ण करणार आहेत.

             तसेच गाडी क्रमांक 07626 पनवेल ते  हुजूर साहिब नांदेड   विशेष गाडी 23 एप्रिल ते 27 जून दरम्यान दर मंगळवारी आणि गुरुवारी पनवेल रेल्वे स्थानकावरून दुपारी 2.30 वाजता सुटेल  आणि कल्याण, इगतपुरी, अंकाई, नगरसोल, रोटेगाव, लासुर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत, परभणी मार्गे हुजूर साहिब नांदेड  येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 4.30 वाजता पोहोचेल. ही गाडी एप्रिल, मे आणि जून महिन्यात मिळून 20 फेर्‍या पूर्ण करेल. दरम्यान, या गाडीत वातानुकूलित आणि स्लीपर मिळून 22 डब्बे असतील, अशी माहिती दमरेच्या नांदेड जनसंपर्क विभागाने दिली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या