🌟भारतीय जनता पक्ष 'अबकी बार चारसो पार'चा नारा देऊन संख्याबळाच्या आधारावर घटना बदलवू इच्छितो...!


🌟वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची  भाजपावर जोरदार टिका🌟

परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाबराव डख यांच्या प्रचारार्थ आज शुक्रवार दि.१९ एप्रिल रोजी परभणीत वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा झाली यावेळी बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान भारतीय जनता पार्टीचे सरकार बदलवू इच्छित आहे असा गंभीर त्यांनी यावेळी केला.


          परभणी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तथा हवामानतज्ञ पंजाबराव डख यांच्या निवडणूक प्रचारार्थ जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणात वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उमेदवार पंजाब डख,पक्षाचे प्रवक्ते डॉ.धर्मराज चव्हाण,सुरेश शेळके यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

              अ‍ॅड. आंबेडकर यांनी आपल्या भाषणातून भारतीय जनता पार्टीच्या भूमिकांवर जोरदार हल्ला केला. अपकी बार चारसो पार असा नारा दिला जातो आहे, त्यामागील अर्थ सामान्य मतदारांनी ओळखला पाहिजे. विशेषतः या संख्याबळाच्या आधारावरच भाजप घटनेत मोठ्या प्रमाणावर बदल करु इच्छित आहे, हे ओळखले पाहिजे. वास्तविकतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना कोणीही बदलवू शकत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी असो, भारतीय जनता पार्टीचे नेते कधीही या घटनेत बदल करु, असे म्हणत नाहीत. त्यामुळेच मोदी असो, भाजपची मानसिकता दिसून येते. भाजप घटनेत कधीही बदल करु शकतो, हेही स्पष्ट होते. त्यामुळेच सामान्य मतदारांनी महायुतीला कदापि मतदान करु नये, असे आवाहन अ‍ॅड. आंबेडकर यांनी केले.

               पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील या सरकारने सातत्याने भांडवलदार आणि व्यापार्‍यांचे हीत जोपासले आहे. शेतकर्‍यांच्या शेतमालास योग्य मोबदला मिळत नाही, हे वास्तव आहे. परंतु, सरकार त्या दृष्टीकोनातून कधी गांभीर्याने विचारमंथन करीत नाही, हे दुर्देव आहे. मूळातच व्यापारी आणि सरकारचे साटेलोटेच यास कारणीभूत आहे, अशी टिकाही आंबेडकर यांनी केली. पंतप्रधान मोदी हे गेल्या दहा वर्षांपासून सत्ता राखून आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बळावरच मोदींनी सत्ता गाठली. परंतु, मोदींना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीसुध्दा गरज राहिली नाही, अशी टिकाही आंबेडकर यांनी केली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या