🌟कळमनुरीत शिवसेना आ.संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत असंख्य कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश....!


🌟यावेळी शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते🌟

हिंगोली : हिंगोली जिल्ह्याचे शिवसेना (शिंदे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत आज रविवार दि.२१ एप्रिल रोजी आ.बांगर यांच्या उपस्थितीत कळमनूरी शहरातील पठान गल्लीतल्या असंख्य मुस्लिम बांधवांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. 

शिवसेना पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये मुस्लिम समाजातील काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते शमशेर अली खान पठान,फारूख पठान,जावेद पठान,लुकमान सिद्दीकी,हाजी वाजेद कादरी,शबीर पठान,शैख आदिल,नसीर सिद्दीकी,शेख शफीक,अदनान पठान,मोहम्मद अमन,शेख मुबलिक,शोहेब पठान,मेहराज पठान,शोहेब मुल्लाजी,समीर सिद्दीकी,नदीम अहमद,मोहसिन पठान,ताहेर पठान,अरबाज पठान,सोहेल पठान,इरफान पठान,सरफराज पठान सलमान पठान,नोमान पठान इतर असंख्य मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

          यावेळी शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या