🌟परभणी लोकसभा मतदारसंघातील मतदात्यांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


🌟विशेषतः मतदार संघाच्या बाहेर वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवश्य यावे🌟

परभणी (दि.25 एप्रिल) : लोकसभा निवडणुक 2019 मध्ये परभणी लोकसभा मतदार संघात 63 टक्के मतदान झाले होते. परंतू या निवडणूकीत सर्व मतदारांच्या सहकार्याने मतदानाची टक्केवारी वाढवायची असून, ती यावेळेस 75 टक्क्यांवर घेवून जायची आहे. यासाठी मतदारांनी आपली लोकशाही सक्षम करण्यासाठी मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस म्हणून साजरा न करता लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा करणे आवश्यक आहे. 

मतदार संघातील सर्व मतदारांनी उद्या दि.26 एप्रिल रोजी साजरा होणाऱ्या या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होवून आपला मतदानाचा हक्क आवश्य बजवावा. विशेषतः मतदार संघाच्या बाहेर वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवश्य यावे. सर्वांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी जरूर सहभागी व्हावे.‘नव मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून, लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी व्हावे आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रेरित करावे, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी मतदारांना आवाहन केले आहे.....

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या