🌟मतदारांचे आभार मानण्यासाठी अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याकडून भेटीगाठी....!


🌟अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी लग्न सोहळ्याच्या निमित्ताने मतदारसंघात भेटीगाठींना सुरुवात🌟


गंगाखेड (दि.२९ एप्रिल) -
लोकसभा निवडणुकी त्यानिमित्ताने मतदारांचे जाहीर आभार मानण्यासाठी अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी मतदारसंघात मतदानाच्या दुसरे दिवशी पासूनच भेटीगाठींना सुरुवात केली आहे.

अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी लग्न सोहळ्याच्या निमित्ताने मतदारसंघात भेटीगाठींना सुरुवात केली आहे. रविवारी पिंपरी झोला या गावात उपस्थित राहून  मतदारांना प्रत्यक्ष भेट घेत त्यांचे आभार मानले. सोमवारी खादगाव, धनगरमोहा ,हरंगुळ येथील मतदारांच्या भेटी घेतल्या. धनगर मोहा येथील सरपंच भगवान खांडेकर व सहकार यांच्या भेटी घेतल्या. आगामी काळात आपल्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध असेल अशी ग्वाही त्यांनी मतदारांना दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या