🌟परभणी लोकसभेसाठी महायुतीने दिला निष्कलंक उमेदवार : महादेव जानकरांवर ना गंभीर गुन्ह्यांची नोंद नाही कुठले कर्ज...!


🌟उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी दिलेल्या शपथपत्रात उघड : एकूण चलसंपत्ती ०१ कोटी २५ लाख १० हजार ५७८ एवढी🌟 

परभणी (दि.०३ एप्रिल) :  परभणी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी बहाल केलेले महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर अगदी निष्कलंक  असुन त्यांच्यावर एकाही गंभीर गुन्ह्यांची नोंद तर नाहीच याशिवाय त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे कर्ज देखील नसल्याचे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी दिलेल्या शपथपत्रातील माहितीतून उघड झाले असून महायुतीने दिलेला लोकसभा उमेदवार निष्कलंक असल्याचे उघड झाले आहे.

                निवडणूक लढविणार्‍या इच्छुकांना आयोगाने उमेदवारी अर्ज दाखल करतेेवळी शपथपत्राद्वारे संपत्ती, गुन्हे व कर्जाबद्दल माहिती सादर करणे बंधनकारक केले आहे. त्याप्रमाणे जानकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी जोडलेल्या शपथपत्राद्वारे आपल्यावर कोणत्याही प्रकारचा एकही गंभीर गुन्हा नाही, असे नमूद केले. सार्वजनिक ठिकाणी भाषण केल्याबद्दल एक गुन्हा आहे. त्याव्यतिरिक्त अन्य कोणताही गंभीर गुन्हा नाही. तसेच आपल्यावर  कोणत्याही प्रकारचे कर्जही नाही, असे नमूद केले. संपत्तीचे विवरण देतेवेळी जानकर यांनी आपल्या नावे १८ एक्कर १४ गुंठे एवढीच शेतजमीन आहे. स्टेट बँक ऑफ इंडियात ५१ लाख ६६ हजार ७७९ रुपयांची एफडीआर आहेत. त्याबरोबर गोल्ड बॉन्ड स्किममध्ये ७९१ ग्रॅम सोन्यात गुुंतवणूक केले आहे. त्याचे मूल्य ३९ लाख ९६ हजार एवढे आहे. सद्यस्थितीत ९७ हजार ३३० रुपये जवळ आहेत, असे स्पष्ट केले. एकूण चलसंपत्ती ०१ कोटी २५ लाख १० हजार ५७८ एवढी आहे, असेही म्हटले. शेतजमीनी व्यतिरिक्त अकृषिक जमीनसुध्दा सोलापूर, जालना जिल्ह्यात आहे. तसेच रायगड, पुणे आणि नगर, मुंबई या ठिकाणी निवासस्थानेही आहेत, असे म्हटले........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या