🌟पुर्णा तालुक्यातील ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वंचितच्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याने मिळवून दिला न्याय....!


🌟दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पडला आतापर्यंत ०९ कोटी रुपयांचा ओला दुष्काळ नुकसान भरपाई निधी🌟

परभणी/पुर्णा : परभणी जिल्ह्यासह पुर्णा तालुक्यातील देखीाल नोव्हेंबर २०२३ या महिन्यात सर्वत्र वादळीवाऱ्यासह ढगफुटी सदृश्य परिस्थितीतून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन,तुर,मुग,उडीद,हायब्रीड ज्वारी,बाजरी,मका,साळ तसेच मोसंबी,संत्रा,केळी,चिक्कू आदी बागायती पिकांसह पालेभाज्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता कोणीही पुढे आले नाही परंतु वंचितचे ग्रामीण भागातील उभरते नेतृत्व तथा समाजसेवक माणिकराव सुर्यवंशी यांनी ओला दुष्काळग्रस्त सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रशासनाने नुकसानभरपाई द्यावी यासाठी २८ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना लेखी स्वरूपात निवेदन देऊन परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यासह सर्वच तालुक्यातील ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ नुकसानभरपाई अनुदान जमा करण्याची मागणी केली होती.

परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी माणिकराव सुर्यवंशी यांच्या निवेदनावर कारवाई करीत ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई अनुदान जमा करण्याची कारवाई युध्द पातळीवर आरंभल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपर्यंत जवळपास ०९ कोटी रुपयांचे अनुदान जमा झाल्याचे समजते वंचिततच्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याने शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असून माणिकराव सुर्यवंशी यांचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या