🌟आपणच काय खा.जाधव सुध्दा परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र नाहीत : आपणास उपरे वगैरे संबोधित करणे बालिशपणाचे लक्षण...!


🌟महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्याकडून खा.संजय जाधव यांच्यावर जोरदार हल्ला🌟

परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघातील विद्यमान शिवसेना (उबाठा) गटाचे खासदार तथा महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी आपल्या विरोधात मागील दोन-चार दिवसांपासून सुरु केलेली बेताल अशी विधान म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्याचेच ते लक्षण आहे असे मत महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांच्याकडे आपल्या किंवा महायुतीच्या विरोधात मांडण्यासारखे कोणतेही मुद्दे नाहीत हे ओळखूनच महाविकास आघाडीचे उमेदवार जाधव यांनी आपल्या विरोधात व्यक्तीशः टिका टिप्पणी सुरु केली आहे, असे नमूद करतेवेळी जानकर यांनी आपणच काय खा.बंडू जाधव सुध्दा परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र नाहीत ते लातूर जिल्ह्याचे आहेत अशी टिप्पणी करतेवेळी आपण परभणीतच राहणार आहोत. परभणीच्या मतदार यादीतच आपले नाव यापुढे राहणार आहे. नव्हे, आपण परभणीकर म्हणूनच यापुढे ओळख राखू, असे स्पष्ट केले. आपणास उपरे वगैरे संबोधित करणे बालिशपणाचे लक्षण आहे. आपण काही पाकिस्तानी नाहीत, महाराष्ट्रीयनच आहोत. वर्षानुवर्ष चळवळीत राहिलो आहोत. इमाने इतबारे काम करत आलो आहोत. कधीही नुसत्या गप्पा मारल्या नाहीत. विकासात्मक भूमिका, त्यासाठी सकारात्मक प्रयत्न हेच आपले ध्येय आहे, हेच आपले व्हिजन आहे. त्यामुळे जाधव यांनी आपली फारशी चिंता करु नये, त्यांच्यात व आपल्यात खूप मोठा फरक आहे. आपण लीडर आहोत ते लॅडर आहेत, अशी जोरदार टिप्पणी करतेवेळी जाधव यांनी वैचारिक पातळीवर, बौध्दिक पातळीवर, विकासाच्या पातळीवर बोलावे, असा सल्ला देवून जानकर यांनी आपण या मतदारसंघातील सर्व समाज घटकांना सोबत घेवून कार्यरत राहू, जातीवाद करण्याची संकुचित प्रवृत्ती आपल्यात नाही, असेही म्हटले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या