🌟परभणी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी जागेवर निवड संधी.....!


🌟जिल्ह्यातील जास्तीत-जास्त सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी सहभाग नोंदवावा - सहायक आयुक्त प्र.सो.खंदारे 

परभणी (दि.06 एप्रिल) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने सुशिक्षित बेरोजगारांसाठी शासकीय तंत्र प्रशाला, स्टेडियम जवळ, नारायण चाळ, परभणी येथे बुधवार दि.10 एप्रिल रोजी जागेवर निवडसंधीचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत गोदावरी ट्रॅक्टर्स, गंगाखेड रोड, परभणी यांच्याकडील सेल्समन, अकाउंटंट, क्लार्क, मेकॅनिक/हेल्पर, ड्रायव्हर व ऑफिस बॉय या पदाकरिता भरती करण्यात येणार आहे. 

तरी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी सहभाग नोंदवावा. तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयाचे दुरध्वनी क्र. 02452-220074 वर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त प्र.सो. खंदारे यांनी केले आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या