🌟महविकास आघाडीचे उमेदवार खा.जाधव यांच्या पत्नी सौ.क्रांतीताई जाधव यांनी घेतल्या मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी🌟
पुर्णा : परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार खा.संजय उर्फ बंडू जाधव यांच्या डोअर टू डोअर प्रचाराला वेग आला असून त्यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सौभाग्यवती सौ.क्रांतीताई संजय जाधव या काल सोमवार दि.१६ एप्रिल २०२४ रोजी पुर्णा शहरात आल्या होत्या यावेळी सौ.क्रांतीताई जाधव यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा)-राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार-भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह महिला आघाडीच्या सन्माननीय महिला पदाधिकारी व माता भगिनींना सोबत घेऊन शहरातील मस्तान पुरा येथील मतदारांच्या डोअर टू डोअर प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या मशाल या निवडणूक चिन्हावर मतदान करण्याची विनंती केली.
यावेळी सौ.क्रांती ताई संजय जाधव यांच्या सोबत परभणी जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे जिल्हा उपाध्यक्ष वहीद कुरेशी जिल्हा,माजी उपनगराध्यक्ष सलीम महंमद साहब, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोशल मिडिया सेलचे जिल्हाध्यक्ष निखिल धामणगाव,पुर्णा शहर कॉंग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष शेख अहेमद,प्रतिष्ठीत व्यापारी शेख इलियास (बर्तनवाले),काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष शेख रफीक, पुर्णा शहर कॉंग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष पांडुरंग कदम,सुनील ठाकुर,राष्ट्रवादी काँग्रेसचे कुरेशी,इलियास तांबोळी तसेच शिवसेनेचे संतोष एकलारे माजी नगराध्यक्ष,गोविंद कदम शाम कदम माजी नगरसेवक ,मंजाजी कदम शहर अध्यक्ष शिवसेना बंटी कदम माजी शहर अध्यक्ष शिवसेना, भालेराव माजी नगरसेवक, व इतर अनेक काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते......
0 टिप्पण्या