🌟परभणीत मातंग समाजाची पहिली राज्यस्तरीय झेंडा परिषद संपन्न....!

🌟मातंग समाजाचा एक झेंडा होईपर्यंत शांत बसणार नाही - राधाजी शेळके🌟 

परभणी (दि.12 एप्रिल) : मातंग समाजाच्या अनेक संघटना आहेत आणि त्यांचे वेगवेगळे झेंडे आहेत त्यामुळेच हा समाज विखुरलेला दिसतो, परंतु यापुढे जोपर्यंत समाजाचा एक झेंडा होत नाही तो पर्यंत आपण शांत बसणार नाही, अशी ग्वाही लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष राधाजी शेळके यांनी दिली.

             लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने गुरुवारी (दि.11) येथील कौस्तुभ मंगल कार्यालयात मातंग समाजाची पहिली ऐतिहासिक झेंडा परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी या परिषदेचे मुख्य संयोजक शेळके हे बोलत होते. या पुढे अशा परिषदा राज्यातील सर्व विभागात घेतल्या जातील, त्याचे लवकरच नियोजन करण्यात येईल, अशी माहितीही शेळके यांनी यावेळी दिली.

            या परिषदेला लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे, लहुजी विद्रोही सेनेचे संस्थापक अध्यक्ष भास्कर नाना शिंदे, अखिल भारतीय मातंग संघाचे प्रतिनिधी मनोहर गवारे, डी. जी. मस्के, मानवी हक्क अभियानचे प्रतिनिधी पप्पू शेळके, लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे इंजि. तोडे, अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे विनायक वाघोले, लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे बन्सीलाल भंडारी, गणपतराव कांबळे, हमाल युनियनचे शेषेराव सावळे, रोहिदास अण्णा नेटके, मनपा कर्मचारी युनियनचे के. के. भारसाकळे, प्रा. अंकुश कांबळे, एम. डी. वाहूळे, बाबासाहेब पाटोळे, गणेशराव घोडे, सर्जेराव पाटोळे, महादेव घनघाव, दादाराव रोकडे, वासुदेव गायकवाड, महीपती इंगळे, शेषाबाई सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

          प्रास्ताविक युवा नेते शिवाजी शेळके यांनी  तर सूत्रसंचालन काशिनाथ गायकवाड यांनी केले. आभार दिलीप सावळे यांनी मानले. परिषद यशस्वीतेसाठी दीपक चव्हाण, नारायण लोंढे, हनुमान भालेराव, बालाजी नवसे, कन्हैया साळवे, लखन पवार, मुकेश गाडे, गोविंद कांबळे, नागेश खंदारे, हनुमान शिंदे, राजू काळे, डिगंबर आगलावे, बाळू दातरे, विशाल वाहुळे, आकाश अंबोरे, गणेश गायकवाड, सूरज रनखांब आदी लहुसैनिकांनी परिश्रम घेतले....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या