🌟इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन 'इरा' च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार मदन (बापू ) कोल्हे.....!


🌟तर सरचिटणीस पदी श्रीदेवी पाटील यांची फेरनिवड🌟


  
मुंबई -  देशामधील पत्रकारांचे सर्वात मोठे संघटन असलेल्या इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन नवी दिल्ली ची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून तीमध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी परभणी येथील जेष्ठ पत्रकार मदन (बापु)कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे तर सरचिटणीस पदावर श्रीदेवी पाटील (सांगली) यांची फेर निवड  झाली आहे.


पत्रकारांच्या हितासाठी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असलेल्या इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्ली या अग्रगण्य असलेल्या संस्थेची देशातील 22 राज्यांमधून तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर 65 हजार सदस्य संख्या आहे.महाराष्ट्रामध्ये कुशल मार्गदर्शक व संघटन कौशल्य असलेले संजय कुमार कोटेचा यांचे मार्गदर्शनाखाली इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन चे कार्य आघाडीवर आहे, गेल्या एका दशकापासून प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत, राज्यात  विविध उपक्रम राबवून पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न सोडवत करत असलेल्या कार्याची दखल घेऊन संजय कुमार कोटेचा यांना ' इरा  ' च्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर नॅशनल मीडिया सेक्रेटरी पदावर घेण्यात आल्यामुळे , महाराष्ट्रात त्यांचे रिक्त झालेल्या जागेवर सामाजिक तसेच वृत्तपत्र व  पत्रकारांच्या विविध संघटना द्वारे केलेल्या कार्याचा अनुभव पाठीशी असलेले , गेल्या तीन वर्षापासून ' इरा ' च्या परभणी जिल्हा अध्यक्ष पदावर कार्यरत राहिलेले परभणी चे ज्येष्ठ पत्रकार मदन (बापू )कोल्हे यांचे वर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे ,  ' इरा ' महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र , संसदरत्न खा.फौजियाखान यांच्या हस्ते मदन (बापू)कोल्हे यांना प्रदान करण्यात आले आहे.

 विविध सामाजिक व महिलांचे सर्वांगीण विकासासाठी विविध संघटना द्वारे कार्य करणाऱ्या , महाराष्ट्र प्रदेश  सरचिटणीस पदी कार्यरत असलेल्या श्रीदेवी पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी फेर निवड करण्यात आली आहे तर राज्य सचिव पदावर महावीर दोशी यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्य उपाध्यक्षपदी जाहीदा जमादार यांची नेमणूक करण्यात आली आहे वरील सर्व नेमणुकांचे पत्र इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल नविदिल्ली चे राष्ट्रीय महासचिव मोहम्मद जहांगीर यांच्या सहीने प्राप्त झाले आहेत 'इरा' च्या प्रभावी कार्यामुळे दिवसेंदिवस ' इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल ' चा सदस्य संख्या वाढण्याचा आलेख उंचावत आहे........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या