🌟तर प्रदेश अध्यक्ष पदावर श्रीदेवी पाटील व मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदावर मदन कोल्हे यांची फेर निवड🌟
नवी दिल्ली- संपूर्ण देशाच्या विविध राज्यामध्ये सक्रिय असलेल्या नवी दिल्ली येथील महिला उन्नती संस्थेच्या राष्ट्रीय कार्यालयातर्फे,महाराष्ट्राची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून ती मध्ये महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून उत्कृष्ट संघटन कौशल्य असलेले संजय कुमार कोटेचा (सांगली )यांना घेण्यात आले आहे तर संयोजक - दयाशंकर गुप्ता (ठाणे)हे आहेत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी श्रीदेवी पाटील (सांगली )यांची व मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदावर जेष्ठ पत्रकार मदन ( बापू)कोल्हे यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
याशिवाय घोषित करण्यात आलेल्या कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी - मनीषा कोटेचा (पुणे)यांचे सह संगीता गरड (सांगली), मिनाबाई मुथा (इचलकरंजी) , सुनिता गोंदूले (वडगाव कोल्हापूर ) यांना घेण्यात आले आहे . महाराष्ट्र प्रदेश महिला उन्नती संस्थेच्या महासचिव पदावर जाहिदा जमादार (मिरज)तर सचिव पदी दोशी महावीर रतीलाल (सातारा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे .तसेच यावेळी सोबतच महाराष्ट्रातील विविध विभागीय कार्यकारणी गठीत करण्यात आली असून विभागीय अध्यक्षपदांवर खालील प्रमाणे नियुक्ती करण्यात आलेली आहे .
१) मराठवाडा विभाग अध्यक्ष - मदन (बापू) कोल्हे (दुसऱ्यांदा फेरनिवड),
२) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष - राजकुमार डोंबे,
३) मध्य महाराष्ट्र अध्यक्ष - रुपाली कुलकर्णी ,
४) विदर्भ विभागीय अध्यक्ष - स्मिता भारुट.
५) कोकण विभाग अध्यक्ष - सतीश कदम .
वरील सर्व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी व विभागीय अध्यक्षांच्या नियुक्त्या महिला उन्नती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राहुल वर्मा यांच्या स्वाक्षरीनिशी दि.१६/४/२०२४ व दि.२२/४/२४ रोजी प्रसिद्ध करण्याकरीता जाहीर करण्यात आलेल्या पत्राद्वारे केल्या आहेत सर्व पदाधिकाऱ्यांचे महिला उन्नती संस्था परिवारातर्फे स्वागत करण्यात आले असून पुढील उज्वल भविष्यासाठी संस्थेच्या सर्व सभासदांना मंगल कामना व्यक्त करण्यात आल्या आहेत.....
0 टिप्पण्या