🌟हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसाचा तडाखा....!


🌟विज वाहिन्या तुटल्या मोठमठी झाडे कोसळली : बागायती पिकांसह फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान🌟 

✍🏻 शिवशंकर निरगुडे (हिंगोली) 

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साखरा केलसुला धोतरा बोरखेडी  हिवरखेडा आज दि 23/04/2024 रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास वादळीवाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे साखरा गावातील अनेक घरावरील टिन पत्रे उडाली त्यामुळे अनेक ग्रामस्थांचे मोठें नुकसान झाले आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आंबा  बीजवाई कांदा या पिकांचे मोठें नुकसान झाले आहे.


साखरा ते केलसूला रोडवर मोठें मोठें बाभळीचे झाडे कोळसलें त्यामुळे जिंतूर ते रिसोड राज्य मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती केलसुला येथील सरपंच भागवत भूतेकर व ग्रामस्थाच्या वतीने काही वेळात या रस्त्यावरील झाडे  बाजूला करून वाहतूक सुरळीतपणे चालू करण्यात आली तसेंच केलसुला शिवारात विद्यूत खांब देखील कोसळलें आहेत त्यामुळे या भागातील वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे मोठें मोठें झाडे कोसळलें तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या फळझाडाना चांगलाच फटका बसला व तसेंच साखरा फाटा येथील अनेक व्यापाऱ्याचे दुकानचे बोर्ड फाटलें पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या