🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त अभिवादन....!


🌟निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले🌟

परभणी (दि.11 एप्रिल) : क्रांतिसूर्य,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज गुरुवार दि‌.११ एप्रिल रोजी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नायब तहसिलदार मिनाक्षी तमन्ना, अनिकेत पालेपवाड, दत्ता गिणगिने, प्रा. वामनकुमार वाणी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी - कर्मचारी यावेळी उपस्थित होते....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या