🌟पुर्णा तहसिल कार्यालयात उद्या ०१ मे रोजी महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण....!


🌟तहसिलदार माधवराव बोथीकर यांच्या हस्ते तहसिल कार्यालयात सकाळी ०८-०० वाजता होणार ध्वजारोहण🌟

 


पुर्णा (दि.३० एप्रिल) - महाराष्ट्र राज्याचा ६५ वा स्थापना दिवस उद्या बुधवार दि.०१ मे रोजी राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा होत असून त्या निमित्त मुख्य शासकीय समारंभांतर्गत उद्या ०१ मे २०२४ रोजी सकाळी ०८-०० वाजेच्या सुमारास पुर्णा तहसिल कार्यालयात देखील तहसीलदार माधवराव बोथीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

पुर्णा तहसिल कार्यालयात मुख्य शासकीय समारंभांतर्गत उद्या बुधवार दि.०१ मे रोजी सकाळी आठ वाजता आयोजित ध्वजारोहणास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन तहसीलदार प्रशासनाच्या वतीने नायब तहसिलदार प्रशांत थारकर यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या