🌟लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सारिका बडे यांचा सत्कार.....!


🌟डॉ.सारिका बडे यांना अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक या महत्वाच्या पदावर पदोन्नती🌟

परभणी (दि.२४ एप्रिल) - गेल्या काही महिन्यांपासून परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कार्यरत असलेल्या कर्तव्यदक्ष,कार्यक्षम रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सारिका बडे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने रुग्ण सेवा व नियोजनबद्ध कार्य करून कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये व रुग्णाला सर्व सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन प्रशासनाने डॉ. सारिका बडे यांना अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक या महत्वाच्या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. 

डॉ.सारिका बडे यांची हि पदोन्नती झाल्या बद्दल शहरातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारी संघटना लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा शाखा परभणी, समाजहित अभियान प्रतिष्ठान, रुग्ण हक्क संरक्षण समिती व दयावान सरकार महाराष्ट्र राज्य च्या वतीने डॉ.सारिका बडे यांचा परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील जिल्हा शल्यचिकित्सक  कार्यालय येथे   आज दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी  पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला आहे. व डॉक्टर सारिका बडे यांना  पुढील कार्याच्या शुभेच्छा ही देण्यात आल्या आहेत. या सत्काराबद्दल  डॉ. सारिका बडे यांनी  स्वातंत्र्य  पत्रकार महासंघ जिल्हा शाखा परभणी  व उपस्थित त्यांचे आभार मानले आहे. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक परभणी मा.नागेश लखमावार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक परभणी डॉ. सारिका बडे, देवकते नाथा साहेब, लोक स्वातंत्र्य  पत्रकार महासंघाचे परभणी जिल्हा अध्यक्ष  तथा रुग्णहक्क संरक्षण समिती परभणी जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप बनकर, लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी जिल्हा सचिव तथा संस्थापक अध्यक्ष समाजहित अभियान प्रतिष्ठान तथा परभणी जिल्हा कार्याध्यक्ष दयावान सरकार महाराष्ट्र राज्य प्रमोद अंभोरे, रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शेख सरफराज, लोक स्वातंत्र्य  पत्रकार महासंघाचे सभासद तथा संपादक  दैनिक मुस्लिम समाज संघर्ष न्यूज  शेख इसाक, भीमा कोरेगाव मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप वायवळ आदींची उपस्थिती होती. या सत्कार कार्यक्रमाचे संचलन समाजहित न्यूज चे संपादक प्रमोद अंभोरे यांनी केले होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या