🌟प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रयत्नामुळेच भटके विमुक्त पारधी जमातीच्या मतदारांनी पहिल्यांदा मतदानाचा अधिकार बजावला..!


🌟पारधी समाजातील पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नव मतदारांपैकी अनेक मतदार ६५ वर्षा वरील आहेत🌟


परभणी - भारत देशाचे मूलनिवासी भटके विमुक्त पारधी जमातीचे लोक भटकंती करत करत पूर्णा शहरात मागील १४ वर्षापासून वास्तव्यास होते, परंतु त्यांना कोणत्याही मूलभूत गरजा व शासकीय योजनेचा लाभ मिळत नव्हता, अशा भटक्या विमुक्त पालात राहणाऱ्यांचा सर्वे करण्याचे आदेश प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक  बच्चुभाऊ कडू यांचे येताच, प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांच्या मार्गदर्शनाखाली व पूर्णा शहर प्रमुख संजय वाघमारे यांच्या पुढाकाराने पूर्णा शहरातील वास्तव्यास असलेल्या भटक्या विमुक्तांचा सर्वे करण्यात आला, त्यामध्ये ३३ कुटुंब पूर्णा शहरात वास्तव्यास असल्याचे आढळून आले, त्यापैकी आठ कुटुंबाकडे कोणत्याही प्रकारचे शासकीय दस्तऐवज कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे समोर आले, याचा पाठपुरावा करत पहिल्यांदा त्यांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांचे मतदार ओळखपत्र बनवून मतदार यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आणि २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या भारत देशाचे मूलनिवासी असलेले भटके विमुक्त पारधी जमात मतदानापासून वंचित असलेले पूर्णा शहरातील नऊ महिला व सहा पुरुष यांनी पहिल्यांदा मतदानाचा अधिकार बजावून प्रहार जनशक्ती च्या प्रयत्नातून लोकशाहीला बळकट केले, यावेळी मतदाराच्या रांगेमध्ये उभे असलेले पारधी जातीचे लोक पाहून पोलीस प्रशासनासह पूर्णा शहरातील राजकीय पुढारी आवाक होऊन त्यांच्याकडे पाहत होते.

पारधी समाजातील पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नव मतदारांपैकी अनेक मतदार ६५ वर्षा वरील आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रयत्नांमुळे आज त्यांनी पहिल्यांदा मतदान केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या