🌟शिक्षणातून परिवर्तनाचा मार्ग - डॉ. शिवसाब कापसे

🌟पुर्णेतील श्री गुरू बुद्धिस्वामी महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते🌟

पुर्णा : श्री गुरू बुद्धिस्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 जयंतीनिमित्त   व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना डॉ कापसे यांनी म्हटले की शिक्षण हा एक मार्ग आहे ज्यातून मानवी जीवनात आमूलाग्र बदल होत असतो यासाठी त्यांनी डॉ बाबासाहेब यांचेजीवन आणि कार्य समजून घेण्याची आवश्यकता विद्यार्थ्यांना सांगितली, तसेच त्यांनी शिक्षण म्हणजे व्यक्तीचा मानसीक, बौद्धिक विकास करून आणणारेआणि सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्याचे ,आर्थिक विकास साधण्याचे व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी मार्ग प्रशस्त करणारे आहे. व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी विद्येची 24 तास साधना करावी लागेल तरच यशाला गवसणी घालता येईल

   विद्येची ही साधना यशस्वी झाली तर माणूस जगाच्या पाठीवर आपली कीर्ती पसरवू शकतो.महाविद्यालय म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र होय शिक्षणाचे पावित्र्य व समाजाचे  भवितव्य विद्यार्थ्यांच्या हातात आहे विद्यार्थी आपले कर्तव्य नि जबाबदार या कशा पार पडतात यावर समाजाचे  भवितव्य अवलंबून आहे. शिक्षणाबरोबर शिलाची व सदाचाराची आवश्यकता आहे. त्याशिवाय शिक्षणाला महत्त्व नाही हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार होते याकडे त्यांनी  विद्यार्थ्यांन पुढे त्यांनी ठेवला.  

या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. पुष्पा गंगासागर,डॉ. अजय कुररें आयोजन केले.यावेळी महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभागप्रमुख डॉ.वृषाली आंबटकर ,डॉ.संतोष चांडोळे,डॉ. राजू शेख यांची उपस्थित होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या