🌟परभणी लोकसभेचे महाविकास आघाडी उमेदवार खा.संजय जाधव यांना स्वराज्य संघटनेचा जाहीर पाठिंबा.....!


🌟स्वराज्यचे महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य साहेबराव कल्यानकर यांच्या उपस्थितीत देण्यात आला जाहीर पाठिंबा🌟 

🌟 शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना नाय देण्यासाठी संजय जाधव यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे - साहेबराव कल्यानकर


 
परभणी/पुर्णा : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून लोकसभेत पाठवण्याच्या आवाहन माखणी येथे शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी केले. संजय जाधव यांच्या प्रचारानिमित्त विशाल कदम हे माखणी येथे दिनांक ११ रोजी प्रचार अर्थ आले असताना बोलत होते. यावेळी तालुका प्रमुख काशीनाथ काळबांडे, स्वराज्यचे महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य साहेबराव कल्यानकर,मारोती पवार,संपर्कप्रमुख चंद्रकांत पवार गंगाखेड विधानसभा प्रमुख,गोपी इंगोले आदीसह स्वराज्य संघटनेच्या परिसरातील 40 ते 45 शाखाप्रमुखासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य संघटनेचे जिल्हाप्रमुख सचिन आवरगंड यांनी केले होते.

सध्या देशामध्ये व राज्यांमध्ये  शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांना शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना नाय देण्यासाठी प्रचंड मताधिक्याने संजय जाधव यांना निवडून द्यावे असे आव्हान केले यावेळी स्वराज्य संघटनेचे साहेबराव कल्याणकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांना स्वराज्य संघटनेच्या वतीने पाठिंबा देऊन प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन आवरगंड यांनी केले तर आभार व्यक्त इंद्रजीत आवरगंड यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या