🌟'आधार मल्टीस्टेट'च्या वैशालीताई रोडे यांना महिला उन्नती संस्थेचा पुरस्कार प्रदान....!


🌟त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल महिला उन्नती संस्थेतर्फे 'उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले🌟

 परभणी - अत्यंत अल्पावधीमध्ये नावारूपाला आलेल्या ' आधार मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.माजलगाव ' च्या परभणी शाखेमधील सहा. शाखाधिकारी वैशालीताई मुरलीधर रोडे यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल ' महिला उन्नती संस्थे ' तर्फे जाहिर झालेला 'उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्कार ' प्रदान करून गौरविण्यात आले आहे.


आर्थिक सल्लागार, प्रबोधनकार तथा नागरी बँका व क्रेडिट सोसायटी यांचे मार्गदर्शक , आधार मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.चे संस्थापक/चेअरमन ॲड.सुनील सौंदरमल यांनी, सामाजिक बांधिलकी पत्करून आर्थिक दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी हाती घेतलेला स्तुत्य उपक्रम म्हणजेच , 'आधार मल्टीस्टेट '.आधार मल्टीस्टेट आधारे सर्व सामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मैलाचा दगड ठरलेला आहे अहोरात्र मेहनत, चिकाटी आणि प्रामाणिकपणामुळे जनतेचा विश्वास संपादन करून 'आधार'ला दिवसेंदिवस जास्तीत जास्त ठेवी मिळण्याचे कामी उत्तम प्रतिसाद मिळत आहे.जनसामान्याबरोबरच मध्यमवर्गीयांना आर्थिक 'आधार 'देण्याचे काम आधार मल्टीस्टेट 'मधील  स्टाॅफ इमाने इतबारे करीत आहेत, त्यांच्या कष्टाचे फळ म्हणजे अत्यंत कमी कालावधीमध्ये बँकेने प्रगती साधून आपली स्वतःची टोलेजंग इमारत आंबेजोगाई या ठिकाणी उभारली आहे .या ' आधार मल्टीस्टेट ' मधील परभणी चे शाखाधिकारी सचिन देविदास सपाटे व सह.शाखाधिकारी वैशालीताई मुरलीधर रोडे यांचे कार्य उत्कृष्ट आहे ,त्यांच्या कार्याची दखल घेऊन बँकेचे व्यवस्थापक सचिन सपाटे यांचा इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन व महिला उन्नती संस्थेतर्फे मराठवाडा विभाग मिडिया चिफ देवानंद शंकरराव वाकळे यांनी पुष्पहाराने सत्कार केला, तर  केंद्र सरकारच्या अखत्यारीतील निती आयोगाअंतर्गत राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या महिला उन्नती संस्थेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या ' महिला सशक्तिकरण अभियाना अंतर्गत ' आधार मल्टीस्टेटच्या सह शाखाधिकारी वैशालीताई रोडे यांना जाहीर झालेला  ' उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्कार ' 4 एप्रिल 2024 रोजी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी च्या सभागृहात इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा महिला उन्नती संस्थेचे मराठवाडा विभाग अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार मदन (बापू )कोल्हे यांचे हस्ते ज्येष्ठ साहित्यिक दि.फ. लोंढे यांचे उपस्थिती मध्ये प्रदान करण्यात आला . बॅंकेच्या रोखपाल आस्वार श्वेता व काजल वाघमारे यांचा सत्कार इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन चे दि.फ.लोंढे व राजकुमार एंगडे यांनी केला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिध्दार्थ जोंधळे यांनी सहकार्य केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या