🌟गुढी मतदानाची आणि मतदार जनजागृती रिल्स स्पर्धेचा निकाल जाहीर....!


🌟गुढी मतदानाची स्पर्धेत शारदा सामाले प्रथम तर महानंदा शिंदे द्वितीय🌟

🌟मतदार जनजागृती रिल्स स्पर्पेत अंगद गरुड-मनीषा उमरीकर प्रथम : मान्यवरांच्या हस्ते होणार पारितोषिक वितरण🌟

परभणी (दि.24 एप्रिल) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे व स्वीप टीमच्या वतीने आयोजित मतदान जनजागृतीसाठी गुढी मतदानाची आणि मतदार जनजागृती रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहेत.

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, स्वीप नोडल अधिकारी प्रा.गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही स्पर्धा संपन्न झाल्या. आयोजक म्हणून प्रा. भगवान काळे, हनुमंत हंबिर, रामप्रसाद अवचार, अरविंद शहाणे, सिद्धार्थ मस्के, त्र्यंबक वडसकर यांनी काम पाहिले. जिल्हाभरात अनेक ठिकाणाहून पारंपारिक गुढी सोबत मतदानाची गुढी सजावट करून अनेक महिला या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. परिक्षकांनी निकाल जाहीर केला असून विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक विशेष कार्यक्रमात देण्यात येणार असून सहभागी महिलांना देखील सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी श्रीकांत दिलीपराव डहाळे, रजनीकांत डहाळे यांच्या वतीने बक्षीस देण्यात येणार आहेत. अशी माहिती स्वीप जिल्हा नोडल अधिकारी प्रा. गणेश शिंदे यांनी दिली.

* स्पर्धेतील विजेते :-

गुढी मतदानाची स्पर्धेतील विजेत्यामध्ये प्रथम क्रमांक - शारदा सामाले, द्वितीय - महानंदा शिंदे, तर तृतीय क्रमांक - संध्या औंढेकर आणि अश्विनी सामाले (विभागून) आदींचा समावेश आहे.रिल्स स्पर्धेतील विजेत्यांमध्ये प्रथम क्रमांक अंगद गरुड-मनीषा उमरीकर तर व्दितीय पारितोषिक विभागून अनुष्का हिवाळे, संदिप राठोड अनिकेत शेंडे यांना देण्यात आला आहे. तृतीय विजया कातकडे व ग्रुप, जितेंद्र देशमुख या दोन संघाना विभागून तर उत्तेजनार्थ गायत्री गोस्वामी, सुप्रिया श्रीमाळी व गुप, शुभागी लोडे, अर्पिता तांबवे याचा समावेश आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या