🌟महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त परभणीत उद्या ०१ मे रोजी पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण...!


🌟सकाळी ०८-०० वाजेच्या सुमारास येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमवर पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण🌟


 
परभणी (दि.३० एप्रिल) - महाराष्ट्र राज्याचा ६५ वा स्थापना दिन राज्यात उद्या ०१ मे २०२४ रोजी सर्वत्र उत्साहात साजरा होत असून परभणीत देखील उद्या बुधवार दि.०१ मे रोजी २०२४ रोजी राज्याचे क्रिडा व युवक कल्याण व बंदरे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री या.ना.संजयजी बनसोडे यांच्या हस्ते उद्या बुधवारी सकाळी ०८-०० वाजेच्या सुमारास येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमवर ध्वजारोहण होणार आहे.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या ६५ व्या दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.....


🌟प्रशासकीय इमारत येथे ध्वजारोहण समारंभ :-

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त्त बुधवार, दि. 1 मे 2024 रोजी सकाळी 6.45 वाजता प्रशासकीय इमारत, परभणी येथे राष्ट्रध्वज रोहणाचा कार्यक्रम अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या हस्ते पार पडणार आहे.    

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम समारंभाला येताना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोषाख परिधान करून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या