🌟महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या मंगळवार दि.२३ एप्रिल रोजी पाथरीत जाहीर सभा.....!


🌟महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ होणार मुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा🌟 


परभणी (दि.२२ एप्रिल) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या मंगळवार दि.२३ एप्रिल रोजी दुपारी ०२-०० वाजता परभणी जिल्ह्यातील पाथरीत महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे.

           परभणी लोकसभा मतदारसंघांतर्गत महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाजपक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे हे मंगळवारी जिल्ह्याच्या दौर्‍यावर दाखल होणार आहेत. पाथरीतील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर महायुतीने आयोजित केलेल्या सभेस ते मार्गदर्शन करणार आहेत. या सभेस महायुतीतील सर्व घटक पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच स्थानिक पातळीवरील नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

          मुख्यमंत्री शिंदे हे जानकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्यावेळी व्यस्त कार्यक्रमामुळे येवू शकले नाहीत. दरम्यान, पाथरीतील मुख्यमंत्री शिंदे यांची सभा लक्षवेधी ठरणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या