🌟भारतीय प्रथम लोकसभा निवड दिन : ईव्हीएमचे जीपियस ट्रॅकिंग कधी करण्यात आले ?

🌟भारतासाठी कायदे करणाऱ्या संसदेचा आणि लोकशाही प्रशासन व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग म्हणजे लोकसभा होय🌟


(नवीन संसद भवन)

लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभेचे सदस्य हे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. लोकसभेची निवडणूक ही भारतीय प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघातून निवडून केली जाते. प्रत्येक लोकसभेचा कालावधी हा जास्तीत जास्त ५ वर्षाचा असतो. भारताची पहिली लोकसभा १९५१ च्या सार्वजनिक निवडणुकीनंतर दि.१७ एप्रिल १९५२ रोजी अस्तित्त्वात आली. १९५७मध्ये ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर ती विसर्जित केली गेली. ही ज्ञानवर्धक माहिती अलककार- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी देत आहेत... संपादक.

     आजच्या या लेखात आपण सांप्रत १७ वी लोकसभा याबद्दलही संपूर्ण माहिती पाहणार आहोत १७ वी लोकसभा भारतामध्ये सद्या अस्तित्वात आहे. भारतासाठी कायदे करणाऱ्या संसदेचा आणि लोकशाही प्रशासन व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग म्हणजे लोकसभा होय. लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ८१ अनुसार  तिची तरतूद केली आहे. तसेच धनविषयक प्रस्ताव हा तेथेच मांडला जातो. संसदेचे सभागृह या नात्याने तेथील सदस्यांचे प्रमुख कार्य- भारतीय राज्यघटनेच्या चौकटीशी सुसंगत असे कायदे बहुमताने बनवणे, हे असते. अर्थात हे सदस्य राज्यकारभाराच्या विधिमंडळ शाखेचे सदस्य आहेत.

     प्रत्येक लोकसभेचा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षे असतो. त्यानंतर लोकसभेचे आपोआप विसर्जन होते व नव्या लोकसभेसाठी निवडणुका होतात. याला आणीबाणीची परिस्थिती हा एक अपवाद आहे. आणीबाणीची परिस्थिती जाहीर केल्यास तीचा कालावधी एक वर्षाच्या टप्प्यामध्ये ५ वर्षाहून अधिक काळही वाढवता येतो. लोकसभेस प्रथम सभागृह असेही म्हणतात. आपल्या भारत देशात राज्यागणिक मतदारसंघ आहेत. लोकसभा हा शब्द संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या पाठोपाठ निवडणुकांमधील कालावधीसही वापरतात. इ.स.२०१९पर्यंत भारतामध्ये १७ लोकसभा- कालावधी झाले आहेत. लोकसभेचे सदस्य हे जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघांतून थेट निवडणूक केली जाते. भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे साधारणतः ५५२ सदस्य असतात. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी, २०पर्यंत सदस्य हे केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी, तर २ सदस्य अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात. जे की राष्ट्रपतीकडुन नामनिर्देषित केले जातात. पण १०४व्या घटनादुरुस्तीनंतर ही दोन पदे रद्द करण्यात आली आहेत.   

      लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभेचे सदस्य हे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. लोकसभेची निवडणूक ही भारतीय प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघातून निवडून केली जाते. प्रत्येक लोकसभेचा कालावधी हा जास्तीत जास्त ५ वर्षाचा असतो. भारताची पहिली लोकसभा १९५१च्या सार्वजनिक निवडणुकीनंतर दि.१७ एप्रिल १९५२ रोजी अस्तित्त्वात आली. १९५७मध्ये ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर ती विसर्जित केली गेली. याप्रकारे भारतात १७व्या लोकसभेची निवडणूक इ.स.२०१९ रोजी झाली. त्यामध्ये मतदान ७ टप्यात पार पडले. मतदानाचा पहिला टप्पा हा दि.११ एप्रिल २०१९ रोजी पार पडला. दुसरा टप्पा हा दि.१८ एप्रिल २०१९ला झाला, तिसरा टप्पा हा २३ एप्रिलला पार पडला, चौथा टप्पा २९ एप्रिलला झाला, पाचवा टप्पा ६ मे रोजी झाला, सहावा टप्पा १२ मे रोजी आणि सातवा टप्पा हा १९ मेला झाला. अशाप्रकारे सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत सात टप्प्यात मतदान झाले. मतमोजणी दि.२३ मे २०१९ रोजी पार पडली. महाराष्ट्र राज्यात एकूण ४८ मतदार संघ होते. सांप्रत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे वाराणसी या उत्तर प्रदेशातील मतदारसंघातून निवडून आले होते. 

      भारतीय राज्यघटनेच्या कलम ८१ अनुसार लोकसभेची तरतूद केली गेली आहे. ती लोकसभेच्या रचनेसाठी लागू आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोघींमध्ये काय फरक आहे? बघा- लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. हिची तरतूद ही भारतीय राज्यघटनेच्या कलम ८१च्या अनुसार केली आहे. यामध्ये धनविषयक प्रस्ताव मांडला जातो. तिचा कालावधी हा जास्तीत जास्त पाच वर्षाचा असतो. त्यामध्ये येणारे सदस्य हे लोकांमार्फत निवडून येतात. तर राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. तिची तरतूद ही भारतीय राज्य घटनेच्या कलम ८०च्या अनुसार केली आहे. तिचा कालावधी हा सहा वर्षाचा असतो. सहा वर्षाचा कालावधी असूनही येथे दर दोन वर्षांनी काही सदस्य निवृत्त होऊन त्या जागी नवीन सदस्य येतात. यामध्ये येणारे सदस्य हे राज्यांच्या विधानसभेने निवडून दिलेले असतात. 

    निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले होते, ते मुद्दे असे होते- सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नव्वद कोटी इतके लोक म्हणजेच मतदारांनी मतदान केले. सन २०१४च्या तुलनेत यावेळी सात कोटी इतके मतदार वाढले होते. पहिल्यांदाच त्यात अठरा- एकोणीस वर्षे वयाच्या दीड कोटी मतदारांनी मतदान केले. आठ कोटी त्रेचाळीस लाख इतक्या नवीन मतदारांनी या निवडणुकीत मतदान केले. असेही निवडणूक आयुक्तांनी माहिती दिली होती, की ईव्हीएम- इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या सुरक्षेसाठी सुद्धा काटेकोर नियम पाळत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता व ईव्हीएमचे जीपियस ट्रॅकिंग करण्यात आले होते. मतदार यादीमधे आपले नाव आहे की नाही? हे पाहण्यासाठी निवडणूक आयोगाने हेल्पलाईन नंबर दिला होता. या हेल्पलाईन नंबरवर फोन करून खात्री पटवून घ्यावयाची होती. संवेदनशील भागांमध्ये सुरक्षेसाठी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले होते.

!! भारतीय प्रथम लोकसभा निवड दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!                    

                      - संकलन व सुलेखन -  

                      श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.

                       मु. पो. ता. जि. गडचिरोली

                       फक्त व्हॉ. नं. ९४२३७१४८८३.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या