🌟परभणीत संबोधी अकादमी महाराष्ट्रच्या वतीने १३ एप्रिल रोजी मोफत तथागत बुध्दमुर्ती वाटपाचा कार्यक्रम....!


🌟माहिती संबोधी अकादमी महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष भीमराव हत्तीअंबीरे यांनी दिली आहे🌟

परभणी (दि.०८ एप्रिल) : परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील बी.रघुनाथ सभागृहात संबोधी अकादमी महाराष्ट्रच्या वतीने दि.१३ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ०२-०० वाजता येथील मोफत बुध्दमुर्ती वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संबोधी अकादमी महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष भीमराव हत्तीअंबीरे यांनी दिली आहे.

           वर्ल्ड अलायन्स ऑफ बुध्दिस्ट यांच्या सहकार्याने थायलंड येथून संबोधी अकादमीला बुध्द विहाराकरिताच्या बुध्दरुप (बुध्दमुर्ती) प्राप्त झाल्या आहेत. हा  बुध्दमुर्ती वाटपाचा कार्यक्रम वर्ल्ड अलायन्स ऑफ बुध्दिस्टचे अध्यक्ष पूज्य भदंत डॉ. पोरनचाई पालवधम्मो (थायलंड), जॉइंट सेक्रेटरी जनरल डॉ. मिथिला चौधरी (बांग्लादेश), माध्यम समितीचे ज्येष्ठ सदस्य पूज्य भदंत इतिपोन पोकियाकुल (थायलंड), सिंगापूर येथील सी चून पोह, लिब होन कुएट, सी जिओक चू, ओह टेंग मिशेल, फैग चिन लेगोन व म्यानमार येथील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व संबोधी अकादमीचे अध्यक्ष भीमराव हत्तीअंबीरे अध्यक्षतेखाली शनिवार 13 एप्रिल रोजी येथील बी. रघुनाथ सभागृहात होणार आहे.

            या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन भगवानराव जगताप, डॉ. अरविंद सावते,  भीमराव पतंगे, शेषराव जल्हारे, गौतम मुंढे, दि. फ. लोंढे, सचिन रणखांबे, कल्याण वाघमारे, विनोद घुंबरे, परमेश्वर डबडे, अजय गायकवाड, शिलवंत डबडे, अमोल कांबळे, राज गवळे, नवनाथ पैठणे, रमेश जोंधळे, मदन कोल्हे, गौतम कठाळे, गोरखनाथ कांबळे, प्रभाकर वाव्हळे, राहुल वाघमारे, नितीन कांबळे, बाळू किर्तने, अ‍ॅड. सुनिल बगाटे, विजय बगाटे, त्रिशरण वाटोडे, किशन सावणे, विश्‍वनाथ डबडे, रमेश जोंधळे, विनोद भूमरे, अजय गायकवाड, कल्याण वाघमारे, नवनाथ पैठणे, राहूल वाघमारे, देवानंद वाकळे, राजेश पौळे, सचिन रणखांबे, नितीन कांबळे, माधव मोते आदींनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या