🌟नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.....!


🌟वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला🌟

नांदेड (दि.१४ एप्रिल) - नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आज रविवार दि.१४ एप्रिल रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी नांदेड लोकसभा उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर,सुरेंद्र घोडसकर,कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण,अनिल मोरे,विठ्ठल पावडे,गंगाधर सोंडारे व जिल्हा परिषद सदस्य,नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या