🌟भारतीय जनता पक्षाच्या रणरागिणी माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांची उद्या दि.२३ एप्रिल रोजी जिंतूर येथील बैठकीस हजेरी....!


🌟राष्ट्रीय सचिव तथा मा.ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या संयुक्त बैठकीस मार्गदर्शन करणार🌟 

परभणी (दि.२२ एप्रिल) :  परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जगन्नाथराव जानकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी ग्रामविकास मंत्री रणरागिणी पंकजाताई मुंडे या उद्या मंगळवार दि.२३ एप्रिल रोजी जिंतूर येथे उपस्थित राहून महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या संयुक्त बैठकीस मार्गदर्शन करणार आहेत.

             जिंतूर येथील राधाकृष्ण मंगल कार्यालय ग्रीनपार्कच्या सभागृहात उद्या मंगळवार दि.२३ एप्रिल रोजी दुपारी ०२-०० वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्या बैठकीस आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर या उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्त्यांनी या बैठकीस मोठ्या संख्यने उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार सौ.साकोरे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या