🌟परभणी लोकसभा मतदारसंघात काल झालेल्या मतदानाची मतदान यंत्र कडक संरक्षणात स्ट्राँगरुममध्ये....!


🌟लोकसभेसाठी एकुण 62.26 टक्के मतदान : जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून दोनदा टक्केवारीची घोषणा🌟 


परभणी (दि.27 एप्रिल) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दूसऱ्या टप्प्यात परभणी लोकसभा मतदार संघासाठी शुक्रवार, (दि. 26) रोजी मतदान शांततेत व सुरळीत पार पडले. परभणी लोकसभा मतदार संघात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रथमतः काल शुक्रवार दि.26 एप्रिल 2024 रोजी रात्री 11.36 वाजता अंदाजे 60.09 टक्के मतदान झाल्याची घोषणा केली होती परंतु जिल्हा निवडणूक अधिकारी गावंडे यांनी आज शनिवार दि.27 एप्रिल रोजी पुन्हा अधिकृत परिपत्रक जारी करून एकूण 62.26 टक्के मतदान झाल्याची घोषणा केली आहे.


परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघातील 2 हजार 290 मतदान केंद्रातून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यामध्ये 95-जिंतूर विधानसभा मतदार संघात 62.43 टक्के तर 96-परभणी 62.62 टक्के, 97-गंगाखेड, 63.00 टक्के, 98-पाथरी 64.27 टक्के, 99-परतुर 59.60 टक्के आणि 100-घनसावंगी विधानसभा मतदार संघात 60.93 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून, परभणी लोकसभा मतदार संघात एकुण 62.26 टक्के मतदान झाले असल्याची  माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली. 

* मतदान यंत्र स्ट्राँगरुममध्ये सीलबंद :-


परभणी लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान यंत्र कडक सुरक्षेत वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ, परभणी येथील कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्ट्राँगरुममध्ये सुरक्षितरित्या आणण्यात आले. यावेळी निवडणूक आयोगाचे निरिक्षक  कृष्णकुमार निराला, जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, सर्व सहायक निवडणुक निर्णय अधिकारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्क्रुटणी प्रक्रिया करून सर्व मतदान यंत्र स्ट्राँगरूममध्ये सुरक्षित सीलबंद करण्यात आली.....

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या