🌟परभणी लोकसभेचे अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर याचे कुणबी मराठा प्रमाणपत्र व 'संगेसोयरे'च्या अध्यादेशासाठी शपथपत्र....!


🌟शपथपत्रात मराठा समाज बांधवांच्या आंदोलनासह त्यांच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर राहण्याचेही दुधगावकरांचे आश्वासन🌟 


परभणी (दि.०९ एप्रिल) - परभणी लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक मैदानात उतरलेले अपक्ष उमेदवार समीर गणेशराव दुधगावकर यांनी सकल मराठा समाजाला दि.२६ मार्च २०२४ रोजी शंभर रुपयांच्या बॉंडवर चक्क शपथपत्र देऊन शपथपत्राद्वारे सकल मराठा समाज संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मराठा समाज बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी शासनाने 'सगेसोयरे'चा अध्यादेश काढावा या मागणीसाठी मी कटीबद्ध राहील तसेच मी मराठा समाज बांधवांच्या आंदोलनात आणि त्यांच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर असेल याकरिता मी मराठा समाज बांधवांना हे शपथपत्र लिहून देत आहे असे शपथपत्रात समीर दुधगावकर यांनी नमूद केले आहे.

अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर यांनी शंभर रुपयांच्या बॉंडवर दिलेल्या शपथपत्राचा सकल मराठा समाजावर काय परिणाम होतो हे तर निवडणूक निकालानंतर समोर येईलच परंतु समाजाप्रती त्यांची असलेली तळमळ या शपथपत्रातून निश्चितच समोर आली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या