🌟वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस.यांनी पोहरादेवी येथे रामनवमी यात्रेच्या निमित्ताने दिली भेट....!


🌟याबाबत विस्तृत मार्गदर्शन करून आढावा सभा घेऊन निर्देश दिले🌟


फुलचंद भगत

वाशिम :  पोहरादेवी येथे रामनवमी यात्रेच्या निमित्ताने दि.17 एप्रिल 2024 रोजी वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस.यांनी भेट देऊन पाहणी केली.यावेळी मा अपूर्वा बासुर सहाय्यक जिल्हाधिकारी, वाशिम, मां. विश्वनाथ घुगे निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम, श्री डॉ.ठोंबरे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद वाशिम,शाहू भगत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाशिम, श्री रवि राठोड नायब तहसीलदार निवडणूक, मानोरा, श्री शिंदे पोलीस निरीक्षक मानोरा,श्री संदिप आडे प्रभारी निवासी नायब तहसीलदार, मानोरा, श्री अनंत खोडे उप अभियंता सार्वजनिक बांधकाम, मानोरा, श्री महेश महामुने विधी अधिकारी, वाशिम , श्री धर्मराज चव्हाण स्विय सहाय्यक वाशिम यांची उपस्थिती होती.


मा.जिल्हाधिकारी महोदया यांनी पोहरादेवी येथील रामनवमी यात्रेच्या अनुषंगाने मंदिर परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली.यात्रेच्या ठिकाणी महाराष्ट्रातून व इतर राज्यातून आलेल्या भाविक भक्तांची कोणत्याही प्रकारची गैर सोय होऊ नये. याकरिता यात्रेची पूर्व तयारी म्हणून अनेक वेळा विविध यंत्रणांची आढावा सभा घेतल्या. प्रत्येक विभागाची काय जबाबदारी आहे. त्याबाबत प्रत्येक विभागाचा आराखडा तयार करण्याबाबत सूचना दिल्या. या सर्व विभागाचा एकत्रित पोहरादेवी यात्रा आराखडा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वाशिम यांनी तयार केला.पोहरादेवी यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या भाविक भक्तांची कोणत्याही प्रकारची गैर सोय होणार नाही. याबाबत विस्तृत मार्गदर्शन करून आढावा सभा घेऊन निर्देश दिले.

यात्रेच्या अनुषंगाने पूर्व तयारी म्हणून पोहरादेवी व उमरी खुर्द येथिल स्वच्छ्ता, बाथरूम, फिरते शौचालय, घनकचरा व्यवस्थापन, घंटा गाड्या,अग्निशमन,पिण्याच्या पाण्याच्या टाकी स्वच्छ करणे, पिण्याच्या पाण्याकरिता टँकर ची व्यवस्था करणे,24 तास वीज सुरळीत राहणे, रस्ते, वाहतूक व्यवस्था सुरळीत राहणे,पार्किंग व्यवस्था, आरोग्य व्यवस्था याबाबत महसूल विभाग, पोलीस विभाग, होमगार्ड ,आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभाग, पशू संवर्धन विभाग, पंचायत विभाग, नगर पंचायत विभाग, अग्निशमन दल,परिवहन विभाग, लघु पाटबंधारे विभाग विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, वन विभाग व तहसील कार्यालय, मानोरा,पंचायत समिती, मानोरा ,ग्रामपंचायत कार्यालय पोहरादेवी व उमरी खुर्द येथील अधिकारी व कर्मचारी व नागरिक यांनी यात्रा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

सदर यात्रा सुरळीत सुरू रहावी यामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही.महाराष्ट्रातून व इतर राज्यातून आलेल्या भाविक भक्तांची कोणत्याही प्रकारची गैर होणार नाही तसेच कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही, सर्व भाविक भक्तांना शांततेत दर्शन व्हावे. संपूर्ण गर्दी कंट्रोल मध्ये रहावी यासाठी मा. श्रीमती बुवनेश्र्वरी एस.जिल्हाधिकारी वाशिम यांनी वेळोवेळी आढावा सभा घेऊन प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करून मार्गदर्शन केले. संपूर्ण यात्रेवर बारकाईने लक्ष ठेवले. खूप मेहनत घेतली.

मा. वैभव वाघमारे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांनी वेळोवेळी आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले. आरोग्य विभाग व ग्राम पंचायत विभाग, बांधकाम विभाग यांना यात्रेच्या निमित्ताने वेळोवेळी आढावा घेऊन बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.

यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना घडणार नाही व वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी याकरिता मा. अनुज तारे जिल्हा पोलिस अधीक्षक वाशिम यांनी बारकाईने लक्ष ठेऊन संबधित पोलीस यंत्रणा सुसज्ज राहावी यासाठी मार्गर्दशन केले.यात्रेच्या प्रत्येक ठिकाणी पोलिस पथक तैनात करण्यात आली आहे. यात्रेची गर्दी कंट्रोल करण्याकरिता पोलीस विभाग आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत. यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मा श्री विश्वनाथ घुगे निवासी उपजिल्हाधिकारी वाशिम व मा कैलास देवरे उप विभागीय अधिकारी कारंजा, पोलीस उप विभागीय अधिकारी कारंजा प्रदीप पाडवी,तहसीलदार संतोष येवलिकर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री प्रसाद पाटील, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री चव्हाण, मृद् व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री फेरवाणी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री वानखडे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे श्री राजुस्कर,गट विकास अधिकारी श्री पिल्लेवार, नगर पंचायत विभागाचे मुख्याधिकारी श्री शेवदा,पोलीस निरीक्षक श्री शिंदे,नायब तहसीलदार श्री रवि राठोड, प्रभारी नायब तहसीलदार श्री संदीप आडे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री जाधव,सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री अनंत खोडे उप अभियंता, शाखा अभियंता श्री राठोड , शाखा अभियंता श्री जिरवनकर, मंडळ अधिकारी, तलाठी ग्रामसेवक, लाईनमन, पोलीस पाटील, व जिल्हा पथकातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, धर्मराज चव्हाण,मारोती खंडारे, तोकीर बेनिवाले, मुकिंदा कांबळे यांनी यात्रा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे.तसेच पोहरादेवी व उमरी खुर्द येथील सर्व महाराज मंडळी व गावकरी यांनी यात्रा यशस्वी करण्यासाठी सहकार्य व मदत केली......

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशीम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या