🌟वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कारंजात विशेष पथक पाठवून केली १० जुगाऱ्यांवर धडक कारवाई......!


🌟जुगारड्यांकडून ६८ हजारांचा मुद्देमाल केला पोलीसांनी जप्त🌟

फुलचंद भगत

वाशिम :- समाजात शांतता व सुव्यवस्था नांदावी व अवैध धंद्यांवर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे सतत विशेष मोहिमा राबवत सतत कारवाया सुरु असतात. काहीजण छुप्या पद्धतीने अवैध धंदे करण्याचा प्रयत्न करतात अशा आरोपींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (IPS) यांनी दिले आहेत.

त्या अनुषंगाने दि.०५.०४.२०२३ रोजी मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (IPS) यांना गोपनीय बातमीदाराकडून प्राप्त माहितीच्या आधारे त्यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली कारंजा शहरातील एका बंद पडक्या घरात महाराष्ट्र शासनाकडून प्रतिबंधित असलेला वरली मटका जुगार खेळत असतांना सदर ठिकाणी धाड टाकून ६८,५६०/- रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. कारंजा शहरातील गांधी चौकातील मारवाडीपुरा येथील एका बंद पडक्या घरात पैश्यांवर हारजीतचा जुगार खेळविला जात असल्याच्या गोपनीय माहितीवरून सदर ठिकाणी पंचासमक्ष जाऊन जुगार रेड कारवाई केली. सदर कारवाईमध्ये ०८ आरोपी ताब्यात घेउन त्यांच्याकडून वरली मटका साहित्य व चिठ्ठ्या, नगदी ४२,५१०/- रुपये, ०६ मोबाईल संच व एक कुलर असा एकूण ६८,५६०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व सदर गुन्ह्यात ०२ आरोपी फरार आहेत. सदर आरोपींवर पो.स्टे.कारंजा शहर येथे कलम ४, ५ मजुका अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (IPS), अपर पोलिस अधीक्षक श्री.भारत तांगडे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि.प्रवीण धुमाळ, पोउपनि.रविकांत देशमुख, पोहवा.दिनेश काकडे, पोकॉ.समाधान इंगोले, दादाराव भोयर यांनी पार पाडली. सर्व जनतेस सुजाण नागरिक या नात्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती द्यावी, त्या इसमाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या