🌟परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातील बोरीत चर्जीगल्या लावलेल्या स्कुटीने घेतला अचानक पेट.....!

(फाईल चित्र)

🌟स्कुटी जळून खाक ; दोन लाख रुपयांचे नूकसान🌟

परभणी (दि.२९ एप्रिल) : परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातील बोरी गावात आज सोमवार दि.२९ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास चार्जीगला लावलेल्या स्कुटीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली या घटनेत स्कुटी जळून खाक झाल्याने तब्बल दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.

            या संदर्भात सविस्तर वृत्त असे बोरी येथील डॉ.अभिषेक घुले यांनी आपल्या हॉस्पिटल समोर उभ्या केलेल्या चार्जींगच्या स्कुटीची चार्जिंग उतरल्याने सदरील स्कुटीस चार्जींग साठी लावली अवघ्या काही वेळेतच अचानक स्कुटीने पेट घेतला अन् ती पुर्णपणे खाक झाली आग विझविण्यासाठी काहींनी प्रयत्न केले परंतु स्कुटीची आग विझवण्यात अपयश आले आणि पाहता पाहता स्कुटी पूर्णपणे खाक झाली दरम्यान स्कुटी जळण्या मागील कारण कळले नसून ईलेक्ट्रीक स्कुटी जळण्याच्या या घटना एका पाठोपाठ एक घडू लागल्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या