🌟नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीकरीता रोलिंग कोरिडोअर ब्लॉक.....!


🌟नांदेड-मनमाड एक्सप्रेस करण्यात आली अंशतः रद्द🌟

नांदेड (दि.०४ एप्रिल) : नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीकरीता रोलिंग कोरिडोअर ब्लॉक घेण्यात आल्यामुळे दक्षिण मध्य रेल्वे विभागाने नांदेड ते मनमाड ही एक्सप्रेस अंशतः रद्द केली आहे.

 रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीकरीता रोलिंग कोरिडोअर ब्लॉक घेण्यात आल्यामुळे दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने गाडी क्रमांक ०७७७७ नांदेड ते मनमाड डेमू ही रेल्वे २५ मार्च ते २१ एप्रिल या दरम्यान नांदेड ते पूर्णा दरम्यान अंशतः रद्द करण्यात केली आहे.दि.२१ एप्रिल पर्यंत ही गाडी पूर्णा येथून सुटेल आणि पूर्णा ते मनमाड अशी धावेल तर गाडी क्रमांक ०७७७८ मनमाड ते नांदेड डेमू ही रेल्वे दि.२५ मार्च ते २१ एप्रिल पर्यंत मनमाड ते पूर्णा अशी धावेल व पूर्णा ते नांदेड दरम्यान ही गाडी अंशतः रद्द असेल. दरम्यान, गाडी क्रमांक १७६६१ काचिगुडा ते नगरसोल एक्सप्रेस २५ मार्च ते २१ एप्रिल पर्यंत मुदखेड ते पूर्णा या मार्गावर ६० मिनिटांनी उशीरा धावणार आहे,अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या